AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा खोटारडा.. विराट कोहलीचे चाहते भडकले, हिटमॅनच्या दाव्याने वाद वाढला, थेट..

Rohit Sharma Promo Viral : भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा तूफान चर्चेत असलेले नाव आहे. रोहित शर्मा याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रोहित शर्मा याच्यावर आता विराट कोहली याचे चाहते तूफान भडकले आहेत. त्यांच्याकडून व्हिडीओही शेअर केला जातोय.

रोहित शर्मा खोटारडा.. विराट कोहलीचे चाहते भडकले, हिटमॅनच्या दाव्याने वाद वाढला, थेट..
Rohit Sharma and Virat Kohli
| Updated on: Sep 12, 2026 | 8:34 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अर्थात रोहित शर्मा लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. रोहित शर्मा याचा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सोनी टीव्हीवर फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा हा गेमिंग शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रोहितचा एक वेगळा अंदाज बघायला मिळेल. रोहित शर्मा याच्या या शोकडे लोकांच्या नजरा आहेत. चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, या शोपूर्वीच रोहित शर्मा तूफान अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा याच्यावर आरोप केले जात आहेत. फक्त आरोपच नाही तर रोहित शर्मा याला खोटारडे देखील म्हटले जातंय. प्रोमोच्या शोमध्ये रोहित शर्मा जुन्या गोष्टींना उजाळा देताना दिसतोय. शिखर धवन आणि शोचा होस्ट मनीष पॉल यांच्यासमोर रोहित शर्मा जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. 2014-15 मध्ये झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या किस्सा सांगताना दिसला.

रोहित शर्मा सांगतो की, गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासोबत बाचाबाची झाली. यावेळी शिखर धवन हा माझ्या मदतीला धावून आला. तो ठामपणे त्यांच्याविरोधात उभा राहिला. हा प्रोमो तूफान व्हायरल होत आहे. मात्र, विराट कोहली याचे चाहते संताप व्यक्त करत आहेत. रोहित शर्मा जो किस्सा सांगत आहे तो त्याचा किस्सा नसून विराट कोहली याचा असल्याचे चाहते सांगत आहेत.

ही घटना विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या घडली. यादरम्यान विराटच्या चाहत्यांकडून या किस्स्याचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. रोहित शर्मा खोटारडा असल्याचे अनेकांनी म्हटले.आमच्याकडे व्हिडीओ आहे, रोहित खोटे बोलत असल्याचे विराटच्या चाहत्यांनी म्हटले. रोहित शर्मा नक्की पुढे काय बोलतो हे कळेल. सध्या त्याचा प्रोमोच व्हायरल झाला.

त्यावरच विराट कोहली याचे चाहते पेटून उठल्याचे बघायला मिळतंय. रोहित शर्मा याचा हा शो नक्की काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण पहिल्याच प्रोमोमध्ये शो वादात अडकला. या शोमध्ये रोहित शर्मा नक्की काय काय खुलासे करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 19 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर हा शो प्रसारित होईल. या शोमध्ये असे काही मोठे खुलासे करताना रोहित शर्मा दिसेल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच