Rohit Sharma | नेतृत्वाबाबत विराट कोहलीपेक्षा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा वरचढ : पार्थिव पटेल

रोहित शर्माला टीम इंडियाच्या टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे.

Rohit Sharma | नेतृत्वाबाबत विराट कोहलीपेक्षा 'हिटमॅन' रोहित शर्मा वरचढ : पार्थिव पटेल
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:40 PM

मुंबई : हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिलं. आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्याची रोहितची ही पाचवी वेळ ठरली. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royals Challengres Banglore) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 13 मोसमांमधून एकदाही आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून देता आलं नाही. तेव्हापासून रोहित शर्माला टीम इंडियाच्या टी 20 चे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी क्रिकेट वर्तुळातून करण्यात येत आहे. दरम्यान आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलने (Partiv Patel) याबाबत वक्तव्य केलं आहे. rohit sharma is more sensible than virat kohli about of captaincy said parthiv patel

पार्थिव काय म्हणाला?

“कर्णधारपदाबाबत रोहित विराटच्या तुलनेत जास्त समजदार आहे. दबावात्मक परिस्थितीत कसा खेळ करायचा, निर्णायक क्षणी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीत रोहित विराटपेक्षा वरचढ आहे, अशी प्रतिक्रिया पार्थिवने दिली. स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमात पार्थिव बोलत होता. या कार्यक्रमादरम्यान समालोचक आकाश चोप्रा आणि टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरही उपस्थित होता.

नेतृत्वाबाबतीत विराट श्रेष्ट की रोहित याबाबत गंभीर आणि चोप्रा यांच्यात चर्चा झाली. “टी 20 चे नेतृत्व विराटकडून काढून ते रोहितला देण्यात यावे”, अशी मागणी गंभीरची आहे. “तर टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेणं योग्य ठरणार नाही”, असं आकाश चोप्रा म्हणाला. पुढील म्हणजेच 2021 मध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

पार्थिव बंगळुरुकडून खेळण्याच्याआधी मुंबईचेही प्रतिनिधित्व केलं आहे. पार्थिव विराट आणि रोहित दोघांच्याही नेतृत्वात खेळला आहे. त्यामुळे विराट-रोहित या दोघांच्या नेतृत्वामधील कमी तसेच जमेची बाजू माहिती आहे.

रोहित आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहितने एकूण 6 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. यापैकी 5 वेळा तो कर्णधार म्हणून विजेतपद पटकावलं आहे. तर एकदा हैदराबादकडून खेळताना तो विजयीसंघाचा सदस्य होता.

ऑस्ट्रेलिया दौरा

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्माची केवळ कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 Final, MI vs DC | भावा जिंकलास ! ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

rohit sharma is more sensible than virat kohli about of captaincy said parthiv patel

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.