AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर

रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकेतूनच बाहेर पडला आहे (Rohit Sharma ruled out of ODI and Test series).

टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर
| Updated on: Feb 03, 2020 | 4:53 PM
Share

वेलिंग्टन : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे (Rohit Sharma ruled out of ODI and Test series). न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहितच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे रोहित शर्माला मैदान सोडावं लागलं होतं. आता तो तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकेतूनच बाहेर पडला आहे. याबाबत ‘पीटीआय’ने माहिती दिली आहे (Rohit Sharma ruled out of ODI and Test series). मात्र, बीसीसीआयकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना बुधवारी न्यूझीलंडच्या माउंट माउंगानुई मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. पाचव्या सामन्याच्या विजयात रोहित शर्माची कामगिरी महत्त्वाची ठरली. रोहितने या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 41 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. मात्र, 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत रोहितच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रोहितला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठीही मैदानावर येऊ शकला नाही. सामना जिंकल्यानंतर टीमसोबत ट्रॉफी घेण्यासाठी रोहित शर्मा आला तेव्हा त्याच्या पायाला पट्टी बांधली होती आणि दोन जणांच्या मदतीने तो चालताना दिसला.

पायाच्या दुखापतीमुळे रोहितला आता न्यूझीलंडविरुद्धची पुढची वनडे आणि कसोटी मालिका खेळता येणार नाही. रोहितच्या जागेवर भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार? याबाबत माहिती अजून समोर आलेली नाही. रोहितच्या अगोदर भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर पृथ्वी शॉला वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.

न्यूजीलंड दौरा : एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

1. पहिला वनडे सामना : हॅमिल्टन – 5 फेब्रुवारी

2. दुसरा वनडे सामना : ऑकलँड – 8 फेब्रुवारी

3. तिसरा वनडे सामना : माऊंट माउंगानुई – 11 फेब्रुवारी

न्यूजीलंड दौरा : कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

1. पहिला कसोटी सामना : वेलिंग्टन – 21 ते 25 फेब्रुवारी

2. दुसरा कसोटी सामना : क्राइस्टचर्च – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.