सारा तेंडुलकर हिचे मोठे स्वप्न अखेर पूर्ण, अस्सल मराठीत बोलत म्हणाली, माझी…
सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सारा तेंडुलकरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच आता सारा तेंडुलकर हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. सचिन तेंडुलकर याने मोठा काळ क्रिकेटरमध्ये गाजवला. सचिनचा फक्त देशातच नाही तर विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर हे देखील चर्चेत असतात. सारा तेंडुलकरचे खास व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात गेली होती. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर हिच्या हातामध्ये बियरचे बॉटल दिसत होती. साराच्या हातामध्ये बियरची बॉटल पाहून अनेकांनी थेट टीका केली. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असून खासगी आयुष्याबद्दल अपडेट देताना दिसते.
मध्यंंतरी जोरदार चर्चा होती की, सारा तेंडुलकर ही शुभमन गिल याला डेट करत आहे. मात्र, यावर दोघांनीही भाष्य केले नाही. सारा तेंडुलकर ही मराठी असली तरीही ती फार कधी मराठीत बोलताना दिसत नाही. सध्या सारा तेंडुलकर हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर ही चक्क मराठी बोलताना दिसत आहे. यावेळी तिने आपल्या स्वप्नाबद्दल भाष्य केले.
सारा तेंडुलकर म्हणाली की, मी ज्यावेळी छोटी होते त्यावेळी माझी आजी मला छोट्या छोट्या गोष्टी सोन्याच्या घेत होती. जसे की, छोटे कानातले, छोटी चेन, अशी ती कायमच घेत. माझे स्वप्न होते की, मी ज्यावेळी मोठी होईल, त्यावेळी मी माझ्या स्वत:च्या पैशातून तिला काहीतरी घेईल आणि विशेष म्हणजे आज माझे ते स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे खरोखरच धन्यवाद म्हणताना सारा तेंडुलकर दिसत आहे.
View this post on Instagram
सारा तेंडुलकर एका ज्वेलरीच्या दुकानाच्या ओपनिंगसाठी गेली होती. यावेळी ती मराठीत बोलताना दिसली. अनेक दिवसानंतर सारा तेंडुलकर ही मराठी बोलताना दिसली. सध्या सचिन तेंडुलकर याच्या घरी लग्नीनघाई बघायला मिळतंय सचिनचा लेक अर्जुन याच्या लग्नाची तारीख ठरली. काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकर याने बालपणीची मैत्रीण सानिया हिच्यासोबत साखरपुडा केला.
