Sara Tendulkar : साखरपुडा झाला, सारा तेंडुलकरकडून फोटो पोस्ट, कोण आहे तो भाग्यवान?
Sara Tendulkar Share Engagement Photo : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना अनेक अपडेट देत असते. आता साराने इंस्टा स्टोरीतून तिच्या चाहत्यांसह साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. जाणून घ्या.

साखरपुडा झाला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हीने इंस्टा स्टोरीतून साखरपुड्याचे खास फोट पोस्ट केले आहेत. आता लग्न केव्हा? याची प्रतिक्षा लागून आहे. लग्नाची तारीख समजू शकलेली नाही. मात्र सर्व कसं थाटामाटात होणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. थांबा थांबा, सारा तेंडुलकरचा साखरपुडा झालेला नाही. साराने तिच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याबाबत माहिती दिलीय. सारा तेंडुलकरने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. तसेच सारा तिच्या जीवनात काय काय करते? याबाबतची माहिती ती इंस्टाग्रामवरुन देत असते.
खास मैत्रिणीचा साखरपुडा
सारा तेंडुलकरच्या खास मैत्रिणीचं नाव मल्लिका सारुप्रिया असं आहे. मल्लिका सारुप्रियाला साराचा भाऊ आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर हा देखील इंस्टाग्रामवर फॉलो करतो. मल्लिकाचा साखरपुडा झाला आहे. खास मैत्रिणीच्या साखरपुड्याला साराने हजेरी लावली. साराने यासह या कार्यक्रमाची शोभा वाढवली. साराने साखरपुड्यात मल्लिकासह अनेक फोटो काढले. तसेच सोशल मीडियावर फुल्ल हवा केलीय.
साखरपुडा कोणासह?
मल्लिका सारुप्रिया हीचा साखरपुडा सोहम अग्रवाल याच्यासह झाला आहे. एका बाजूला मल्लिका इंस्टाग्रामवर एकटीव्ह असते. तर दुसऱ्या बाजूला सोहमच्या इंस्टाग्रामवर फक्त 8 पोस्टच आहेत. आता साखरपुडा झालाय म्हंटल्यावर लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार, हे स्पष्ट आहे. साराने मल्लिका आणि सोहम या दोघांच्या या खास क्षणाचे फोटो पोस्ट केले. “माय बेस्ट फ्रेंड इज इंगेज्ड”, असं कॅप्शन साराने या इंस्टा स्टोरीला दिलं आहे.

Sara Tendulkar Insta Story
सारा तेंडुलकरच्या ब्रेकअपची चर्चा!
दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी साराचं अनेक जणांसह नाव जोडलेलं आहे. सारा तेंडुलकर हीचं नाव याआधी टीम इंडियाचा क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र नुकतंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराचं नाव सिंद्धात चतुर्वेदी याच्यासह जोडलं गेलं होतं. हे दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. सारा आणि सिद्धांत या दोघांच्या कुंटुबांनी एकमेकांची भेट घेतली होती, असा दावाही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र आता दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. मात्र ही फक्त चर्चाच आहे. दोघांच्या रिलेशनबाबत अनेक दावे करण्यात आलेत. मात्र दोघांकडून अधिकृतरित्या यावर भाष्य करण्यात आलेलं नाही.
