वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, स्टेन… कुणाला खेळायला घाबरायचा?, सचिन तेंडुलकरने सांगितलं तिसरंच नाव!

वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, स्टेन... कुणाला खेळायला घाबरायचा?, सचिन तेंडुलकरने सांगितलं तिसरंच नाव!
Sachin Tendulkar

जागतिक क्रिकेटमध्ये 'देव' म्हणून ज्याची ओळख आहे त्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केलाय. (Sachin tendulkar Did not like Facing hansie Cronje)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jun 02, 2021 | 1:34 PM

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये ‘देव’ म्हणून ज्याची ओळख आहे त्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केलाय. वसीम अक्रम, लसिथ मलिंगा, ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा यांच्यापासून ते डेल स्टेन, मिशेल जॉन्सन, जेम्स अँडरसन, पॅट कमिन्स या जगातील धोकादायक गोलंदाजांना सचिनने बॅटच्या तालावर नाचवलंय. या सगळ्यांच्या विरोधात सचिन तेंडुलकरने भरपूर रन्स केलेत. या दिग्गज गोलंदाजांनी सचिनला काही वेळा अडचणीत देखील आणलंय. पण सचिनने या सगळ्यांमधला एखादा विक पॉईंट शोधत त्यांच्याविरोधात मैदानाच्या चारही कोपर्‍यात रन्स केलेत. पण जर सचिनला विचारलं की तू कुठल्या बोलर्सला घाबरतोस? किंवा तुला कोणत्या बोलर्सचा सामना करायला अडचणीचं वाटतं? तर सचिनने कुठलं नाव सांगितलं असेल…? सचिनने ज्या गोलंदाजाचं नाव सांगितलं तो पूर्णवेळ गोलंदाज नव्हता… (Sachin tendulkar Did not like Facing hansie Cronje)

सचिनला सर्वाधिक त्रस्त कुणी केलं?

सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्झीविरुद्ध  (Hansie Cronje) खेळताना सर्वात अस्वस्थ वाटायचं, असं सांगितलं. या उजव्या हाताच्या गोलंदाजाचा 1 जून 2002 रोजी विमान अपघातात आपला जीव गमावला. सचिनने काही वर्षांपूर्वी हे कबूल केले होते, त्याच्या कारकिर्दीत त्याने ज्या गोलंदाजांना तोंड दिले होते त्यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे सर्वात कठीण होता.

हॅन्सी क्रोन्जे यांनी दक्षिण आफ्रिकेकडून खेळले 68 टेस्ट, 188 वन डे

वर्ष 2016 मध्ये सचिन तेंडुलकरने खुलासा करताना म्हटलं होतं की, हॅन्सी क्रोन्जेचे आत येणारे चेंडू फलंदाजांना फारच त्रस्त करायचे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने सचिन तेंडुलकरला 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनदा आणि 11 कसोटीत 5 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. हॅन्सीची कारकीर्द फार मोठी नसली तरी मध्यमगती गोलंदाज असलेल्या हॅन्सीने आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांना अनेक वेळा अडचणीत आणले होते. 21 वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग घोटाळ्यात नाव आल्यानंतर हॅन्सी क्रोन्जेची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.

(Sachin tendulkar Did not like Facing hansie Cronje)

हे ही वाचा :

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें