कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, ‘मिशन ऑक्सिजन इंडियाला’ मदत, ‘इतकी’ रक्कम दिली

कोरोनाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच भारतातील अनेक खेळाडू, सेलिब्रेटीदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, 'मिशन ऑक्सिजन इंडियाला' मदत, 'इतकी' रक्कम दिली
Sachin Tendulkar

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. देशात सध्या मेडिकल ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थित कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच भारतातील अनेक दिग्गज खेळाडू, सेलिब्रेटीदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. दिग्गज क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरदेखील यात मागे राहिलेला नाही. सचिनने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःचे योगदान देत 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. सचिनने गेल्या वर्षीदेखील अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. (Sachin Tendulkar Donates 1 Crore To Mission Oxygen To Import Oxygen Concentrators For Covid Hospitals)

सचिन तेंडूलकरने मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीतील 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकरप्रमाणे इतर काही भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी यापूर्वीच आपआपल्या परीने मदत केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनेदेखील कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत केली आहे.

रोहित शर्माकडून 80 लाख रुपयांची मदत

विस्फोटक फलंदाज रोहित शर्माने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 45 लाखांची मदत केली आहे. शिवाय त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत. तसेच त्याने Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली आहे.

ब्रेट लीकडून ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यानेदेखील भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने ऑक्सिजन खरेदीसाठी 1 बिटकाईन म्हणजेज 43 लाखांची केली आहे. ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.

पॅट कमिन्सकडून 50 हजार अमेरिकन डॉलर्सची मदत

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळत आहे. कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,असं तो म्हणाला होता.

श्रीवत्स गोस्वामीचाही पुढाकार

पॅट कमिन्सच्या पुढाकारानंतर एक एक खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपल्या परीने मदत करत आहेत. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या श्रीवत्स गोस्वामीने डोनेटकार्ट चॅरिटेबल सोसायटीला 90 हजारांचे आर्थिक साहाय्य केलं आहे. या मदतीनंतर या संस्थेने ट्विट करत श्रीवत्स गोस्वामीचे आभार मानले आहेत. या संस्थेने केलेल्या ट्विटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचाही उल्लेख (मेन्शन) केलं आहे, कारण या खेळाडूंनीदेखील त्यांच्या परीने मदत केली आहे.

संबंधित बातम्या

ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल

भारत माझं दुसरं घर! ब्रेट लीकडून ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत

(Sachin Tendulkar Donates 1 Crore To Mission Oxygen To Import Oxygen Concentrators For Covid Hospitals)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI