घटस्फोटाच्या निर्णयानंतर पतीसोबतचा फोटो सायना नेहवालने केला शेअर, वाचा काय घडल?
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोठी खळबळ उडवून दिली होती. तिने पतीसोबत विभक्त होणार असल्याचे जाहीर केले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता सायनाने परत एकदा एक पोस्ट शेअर केलीये.

क्रिडा क्षेत्रात मागील काही वर्षांपासून घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल यांचे देखील काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाले आहे. देशातील सर्वात चर्चेतील लग्न सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी देखील घटस्फोट घेतला. यादरम्यानच ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटावर भाष्य केले होते. पती पारुपल्ली कश्यपसोबत विभक्त होत असल्याचे तिने म्हटले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आता परत एकदा सायना नेहवाल हिने एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाबाबत भाष्य केलंय. सायनाने घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचे तिच्या पोस्टमध्ये म्हटले. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर पतीसोबचा फोटो शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली. 13 जुलै म्हणजे 19 दिवसांपूर्वी सायना नेहवाल हिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होत असल्याचे तिने जाहीर केले.
View this post on Instagram
कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. मी आणि पारुपल्ली कश्यपने खूप जास्त एकत्र येऊन विचार केला आणि हा निर्णय घेतला. आम्हाला एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि चांगले जीवन निवडायचे आहे. आतापर्यंतच्या सर्व आठवणी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते आणि त्या बदल्यात नक्कीच मला काहीही नको आहे, असे तिने म्हटले होते. आता 19 दिवसानंतर सायना नेहवालने पतीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, कधीकधी एकमेकांमधील अंतर तुम्हाला लोकांचे महत्त्व सांगते…
येथे आपण दोघेही आहोत आणि पुन्हा एकदा प्रयत्न करत आहोत..असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता सायनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. लोकांनी दोघांनी त्यांच्या नात्याला एक संधी दिल्याने काैतुक केले आहे. सायनाने ज्यावेळी जाहीर केले की, ती घटस्फोट घेत आहे, त्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सायनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत.
