Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

Australia vs India 2nd Test | टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा
राहुल द्रविड

टीम इंडिया पहिल्या कसोटीत अपयशी ठरली. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, असा सल्ला या दिग्गज खेळाडूने बीसीसीआयला दिला आहे.

sanjay patil

|

Dec 21, 2020 | 12:01 PM

मेलबर्न : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून अपमानकारक पराभव (Australia vs India 1st Test) स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. हा सामना अवघ्या तिसऱ्याच दिवशी संपला. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे आश्वासक आघाडी आणि 9 विकेट्सही होत्या. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सपशेल निराशाजनक कामगिरी केली. यामुळे टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला. परिणामी टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. आधी पराभव मग त्यानंतर दुखापतग्रस्त मोहम्मद शमी मालिकेबाहेर. यामुळे टीम इंडिया खिंडीत सापडली आहे. अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा, असा सल्ला टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी बीसीसीआयला दिला आहे. Send Rahul Dravid to Australia to help Team India said Dilip Vengsarkar

वेंगसरकर काय म्हणाले?

“टीम इंडिया अडचणीत आहे. टीम इंडियाच्या मदतीसाठी बीसीसीआयने द्रविडला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवं. ऑस्ट्रेलियामध्ये चेंडूत हवेत स्विंग होतो. या स्विंग होणाऱ्या चेंडूचा सामना कसा करावा, याबद्दल द्रविडशिवाय कोणीच योग्य मार्गदर्शन करु शकत नाही”, असं वेंगसरकर म्हणाले. वेंगसरकर टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलत होते. यादरम्यान त्यांनी हे विधान केलं. “द्रविडच्या उपस्थितीमुळे नेट्समध्ये टीम इंडियाला प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय क्रिकेट एकॅडेमी अर्थात (NCA) 9 महिन्यांपासून बंद आहे. टीम इंडियाच्या मदतीसाठी या जबाबदारीतून काही काळ द्रविड मुक्त होऊ शकतो”, असंही वेंगसरकर यांनी नमूद केलं.

कोरोनामुळे जगभरात अनेक नियम करण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही क्रिकेट संघाला दौऱ्याआधी नियमांनुसार क्वारंटाईन रहावं लागतं. “द्रविडला आताच पाठवलं तर तो त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. त्यामुळे लवकरात लवकर तो टीम इंडियाला नेट्समध्ये मार्गदर्शन करु शकेल”, असंही वेंगसरकर यांनी स्पष्ट केलं.

दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामध्ये पृथ्वी शॉने यशस्वीरित्या अपयशी कामगिरी केली. तर विराट आणि अजिंक्यचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत. यामध्ये ऑलराऊंडर म्हणून हनुमा विहारीच्या जागी रवींद्र जाडेजाला संधी मिळू शकते. तर सलामीवीर म्हणून शुभमन गिलला समाविष्ट केलं जाऊ शकतं. गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने टीम मॅनेजमेंटकडून मोहम्मद सिराजला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. तर सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या पंतलाही खेळवण्यात येऊ शकते.

संबंधित बातम्या :

Icc Test Ranking : विराटची दादागिरी कायम, पुजाराची घसरण, आश्विनने कमावलं बुमराहने गमावलं

Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार

Australia vs India 2nd Test | दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी ‘या’ गोलंदाजाला कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार?

Send Rahul Dravid to Australia to help Team India said Dilip Vengsarkar

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें