पोरी तुझा अभिमान वाटतो…! अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर शफाली वर्मा जे बोलली त्यानं जिंकली सर्वांची मनं

राकेश ठाकूर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 03, 2023 | 9:48 PM

अंडर 19 वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर शफाली वर्मा आणि रिचा घोष दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. सिनिअर संघासाठी चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचं यावेळी रिचा घोषणं सांगितलं.

पोरी तुझा अभिमान वाटतो...! अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर शफाली वर्मा जे बोलली त्यानं जिंकली सर्वांची मनं
अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर शफाली वर्मा आणि रिचा घोष यांनी कंबर कसली आहे. (फोटो- BCCI)

मुंबई: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावलेले शफाली वर्मा आणि रिचा घोष भारतीय वरिष्ठ संघात आहेत. भारतीय महिला संघानं अंडर 19 वर्ल्डकप चषकावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा सन्मान करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते संघाचा सत्कार करण्यात आला. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. आता अंडर 19 वर्ल्डकप संघातील शफाली वर्मा आणि रिचा घोष दक्षिण आफ्रिकेला सिनिअर वर्ल्डकप स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. 12 फेब्रुवारीला भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी शफाली वर्मानं रिचा घोषच्या खांद्यावर हात ठेवून स्पष्टच सांगितलं की, “आता सिनिअर वर्ल्डकप जिंकायचा आहे, रिचा..” रिचा घोषण याबाबत सांगताच भारतीयांचा ऊर भरून आला आहे.

विकेटकीपर बॅटर रिचा घोषनं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, “शफाली वर्मा कायम आमचा आत्मविश्वास वाढवायची. चिंता नका करु आपणचं जिंकणार, असं ठामपणे सांगायची. प्रत्येक सामन्यापूर्वी ती सकारात्मक असायची. अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्याने आमचा आत्मविश्वास वाढण्याबरोबर प्रेरणा मिळाली आहे. आता आम्ही सिनिअर वर्ल्डकप नक्कीच जिंकू. आता अंडर 19 वर्ल्डकप जिंकलो आहोत. आता सिनिअर वर्ल्डकपची जिंकायची वेळ आली आहे. शफालीसारखंच हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ सिनिअर वर्ल्डकप जिंकेल.”

काय झालं होतं 2020 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत

आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत तीन संघांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनं एकदा जेतेपद पटकावलं आहे. गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताला जेतेपद जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि 20 षटकात चार गडी गमवून 184 धावा केल्या. हे आव्हान गाठणं भारतीय संघाला कठीण झालं. अवघ्या 99 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला होता.

भारतीय संघाचे सर्व सामने आणि तारखा

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (12 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (15 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड (18 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध आयर्लंड (20 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI