Shikhar Dhawan : शिखर धवन दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; त्याच्या अन् गर्लफ्रेंडच्या वयात किती अंतर?
Shikhar Dhawan And Sophie Shine Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. गर्लफ्रेंडसोबत शिखर संसार थाटणार आहे. जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी आणि दोघांच्या वयात किती आहे अंतर...

Shikhar Dhawan And Sophie Shine Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे. घटस्फोटाला तीन वर्ष झाल्यानंतर शिखर दुसरा संसार थाटण्यासाठी सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिखर लॉन्ग टाईल गर्लफ्रेंड सोफी शाइन (Sophie Shine) हिच्यासोबत दिल्ली मोठ्या थाटात लग्न करणार आहे… सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. तर शिखर याची गर्लफ्रेंड कोण आहे आणि दोघांच्या वयात किती अंतर आहे… याबद्दल जाणून घेवू…
एका रीलमुळे अलं चर्चांना उधाण… नुकताच, शिखर धवन, सोफी शाइन आणि युजवेंद्र चहल यांचा एक मजेदार रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. रीलमध्ये शिखर विनोदी अंदाजात सोफी हिची ओळख करुन देताना दिसला… सध्या रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फेब्रुवारीमध्ये होणार लग्न…
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी मधील तिसऱ्या आठवड्यात सोफी शाइन आणि शिखर धवन लग्न करणार आहे. हे लग्न दिल्ली-एनसीआरमध्ये होणार आहे. त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. दोघांचं लग्न अत्यंत साधे आणि खाजगी असेल. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक प्रमुख व्यक्ती शिखर आणि सोफी यांच्या लग्नात उपस्थित राहतील असं देखील सांगितलं जात आहे.
कोण आहे सोफी शाईन?
शिखर धवन याची गर्लफ्रेंड, सोफी शाइन, आयर्लंडची आहे. तिचा जन्म जून 1990 मध्ये आयर्लंडमधील लिमरिक येथे झाला. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली. सोफी एक यशस्वी कॉर्पोरेट व्यावसायिक आहे.
दोघांमध्ये वयाचं अंतर किती?
शिखर धवन आणि सोफी शाइन यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 5 वर्षांचं अंतर आहे. शिखर याचं वय 40 वर्ष आहे तर, सोफी हिचं वय 35 वर्ष आहे. आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. चाहते देखील शिखर याच्या दुसऱ्या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
दुसऱ्यांदा संसार थटणार शिखर
शिखर धवन याचं यापूर्वीही लग्न झालं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आयेशा मुखर्जी आहे. शिखर आणि आयेशा यांनी एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव जोरावर आहे. मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर शिखर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार झाला आहे.
