शिखर धवन पुन्हा करणार लग्न, होणारी पत्नी सोफी शाईन आहे तरी कोण ?
Shikhar Dhawan Sophie Shine : टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन लवकरच मॉडेल सोफी शाइनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली-NCR मध्ये हा शाही विवाहसोहळा होणार असून अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील. बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असलेल्या या जोडप्याच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हे दोघे दुबईत भेटले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. धवनचे हे दुसरे लग्न आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी तो चर्चेत असतो. सोशल मीडियावरही शिखर बराच ॲक्टिव्ह दिसतो. याच शिखरच्या घरात आता शहनाईचे सूर ऐकायला येणार आहेत. इंडियन क्रिकेट टीमचा गब्बर म्हणवला जाणारा शिखर धवन हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल सोफी शाइन हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. ते दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात हे दोघे लग्न करणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच दिल्ली-NCRमध्ये शानदार सेलिब्रेशन होणार आहे. या सोहळ्यात क्रिकेट जगतातील तसेच बॉलीवूडमधीलही अनेक सेलिब्रिटी हजर राहणार असल्याचे समजते. लग्नाच्या तयारी कित्येक महिन्यांपासूनच सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोघांसाठी नवी सुरूवात असून सोफी आणि शिखर धवन खूप खुश आहे. लग्नाच्या तयारी शिखर हा स्वत: वैयक्तिकरित्या लक्ष घालत असून आनंदात, सेलिब्रेशनमध्ये काहीच कमी राहू नये यासाठी तो सर्व तयारी जातीने पहात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसले होते एकत्र
या जोडप्याच्या नात्याबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळींनंतर ही बातमी आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान शिखर धवन हा सोफी शाइनसोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला तेव्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पहिल्यांदा सुरू झाल्या. टीम इंडियाच्या गब्बरसोबत असलेल्या रहस्यमय महिलेबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता. तिच्याबद्दल बरंच सर्चही करण्यात आलं होतं. जसजसा वेळा पुढे सरकत गेला तसे सोशल मीडियावर छोटे-मोठे क्ल्यू आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांची हजेरी, यावरून त्यांचं नात कन्फर्म झालं.
View this post on Instagram
रिपोर्ट्सनुसार, शिखर आणि सोफी काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये भेटले होते. पहिले के मित्र बनले आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. त्यानंतर, सोफी आयपीएल 2024 दरम्यान अनेक वेळा दिसली. यापूर्वी शिखर धवनचं लग्न ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या आयेशाशी झालं होतं. त्यांना झोरावर धवन नावाचा एक मुलगाही आहे. शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयेशा किकबॉक्स आहे. 2012 मध्ये त्यांनी वेगळं होत असल्याचं जाहीर केलं, 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर झाला.
View this post on Instagram
कोण आहे सोफी शाइन ?
रिपोर्ट्सनुसार, सोफी ही एक आयरिश प्रोडक्ट कंन्सल्टंट आहे, तिची व्यावसायिक पार्श्वभूमी चांगली आहे. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली असून त्यापूर्वी तिने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं होतं. ती सध्या अबू धाबी, येथे असलेल्या नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये द्वितीय उपाध्यक्ष म्हणून काम करते. प्रसिद्धीच्या झोतात नसली तरी, सोफीने तिच्या ग्लॅमरस लूक आणि स्टायलिश फोटोंमुळे लक्ष वेधलं आहे.
