AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी आता भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयर्लंडविरुद्ध मालिका का गमावली यावर भलतेच उत्तर दिले आहे.

आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना
shreyas iyer
| Updated on: Jul 01, 2026 | 12:52 PM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. भारतीय संघ इंग्लडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहेत. आता आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी खराब होती पण हे कर्णधार श्रेयस अय्यर कबुल करत नाहीये. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वी एक पत्रकार परिषद पार पडली. ज्यात श्रेयस अय्यरने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. जेव्हा त्याला आयर्लंडविरुद्ध मालिका का गमावली असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने काय उत्तर दिले ते पाहा.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने एक असे विधान केले आहे, जे चाहत्यांना पचवणे कठीण जात आहे. माध्यमांशी बोलताना, अय्यरने आयर्लंडकडून झालेल्या पराभवावर आपले विचार व्यक्त केले. कर्णधार अय्यर म्हणाला की, “आयर्लंडकडून झालेला पराभव लाजिरवाणा नव्हता, पण तो निराशाजनक होता आणि त्याने हे मान्य केले की, आयर्लंडचा संघ भारतीय संघापेक्षा चांगला खेळला. भारतीय संघाच्या पराभवासाठी बेलफास्टचे मैदान जबाबदार आहे. बेलफास्टचे मैदान स्टेडियमसारखे नव्हते, म्हणूनच भारतीय संघाला तिथे अडचणींचा सामना करावा लागला.”

अय्यर म्हणाला, “बेलफास्टचे मैदान स्टेडियमसारखे अजिबात नव्हते. आउटफिल्ड संथ आणि असमान होते. तसेच, मैदान चौरसाकृती होते, त्यामुळे एकेरी आणि दुहेरी धावा रोखणे कठीण जात होते. कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षण लावताना थोडे विचित्र वाटले, कारण आम्हाला त्याची सवय नाही. आम्ही आयपीएलमध्ये खेळत होतो आणि सर्व मैदाने सर्व दिशांना अगदी सपाट होती. त्यामुळे आयर्लंडचे मैदान थोडे आव्हानात्मक होते.”

आता इंग्लंडविरुद्ध मालिकेत श्रेयसच्या नेृत्त्वाखाली मालिका जिंकून कमबॅक करण्याची मोठी संधी आहे. जर इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकली तर श्रेयसची कर्णधार म्हणून मालिका जिंकण्याचे हे पहिले यश असेल. आज पहिला सामना रंगणार आहे आणि तो रात्री रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री 10.00 वाजता हा पहिला टी-20 सा्मना खेळवला जाईल.

Follow Us
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!