AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: डबल सेंच्युरीसाठी गिलनं सोसलं एवढं दुखणं की… मॅचनंतर जे सांगितलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Shubman Gill On Double Century: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने दुसरे शतक झळकावले. यानंतर त्याची हालात अतिशय खराब झालेली पाहायला मिळाली. सामन्यानंतर जे म्हणाला ते ऐका.

Shubman Gill: डबल सेंच्युरीसाठी गिलनं सोसलं एवढं दुखणं की... मॅचनंतर जे सांगितलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
| Updated on: Oct 01, 2026 | 9:23 AM
Share

IND vs WI ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. ४०६ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाने एक ऐतिहासिक विजय मिळवला. विरोधी संघावरील या प्रभावी विजयानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिल खूप आनंदित होता पण त्यावेळी तो थकलाही तितकाच होता. सामन्यानंतर गिल काय म्हणाला ते जाणून घ्या…

गिल म्हणाला की, “माझ्या शरीराचा प्रत्येक भाग अजूनही आखडलाय. ” मॅच दरम्यान तो दोन ते तीन वेळा मैदानात हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे पडलाही होता. इतकं दुखत होत तरीही त्याने खेळायचे थांबवले नाही, तो खेळत राहिला आणि शेवटी भारताली विजय मिळवून दिला. तो मॅचबद्दल म्हणाला की,”  दुपारी प्रचंड उणं होते. सामन्यादरम्यान जेव्हा आम्ही १३ षटके क्षेत्ररक्षण केले, तेव्हा असे वाटले की आम्ही २० ते २५ षटके क्षेत्ररक्षण केले आहे. डावाच्या मध्यावर जेव्हा धावफलकावर ४०० धावा होत्या, तेव्हा आम्ही निराश आणि दबावाखाली होतो. खेळपट्टी कितीही चांगली किंवा लहान असली तरी, ४०० धावांचा पाठलाग करणे सोपे नसते. म्हणूनच आजच्या सामन्यातील माझ्या कामगिरीबद्दल मी खूप आनंदी आहे. मी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलो आणि सामना पूर्ण केला, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे.”

सामन्यादरम्यानच्या आपल्या मानसिकतेबद्दल आणि सध्याच्या फॉर्मबद्दल बोलताना तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी खेळाचे लहान लहान भागांमध्ये विभाजन करतो. पॉवरप्लेमध्ये, एकही विकेट न गमावता ७५ ते ८० धावा करणे हे आमचे ध्येय होते, जी एक चांगली सुरुवात ठरली असती. सुरुवातीला, नवीन चेंडूमुळे विरोधी संघाला मदत झाली असती. पण जसजसा चेंडू जुना होत गेला, तसतशी फलंदाजी सोपी झाली. मैदानाचा एक भाग खूपच लहान होता. म्हणून आम्ही ठरवले की जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाज फलंदाजीला येतील, तेव्हा आम्ही त्यांना त्याच भागात लक्ष्य करू.”

“मला वाटत नाही की आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. आम्ही नवीन चेंडूने अचूक टप्पा आणि दिशा राखू शकलो नाही, ज्यामुळे त्यांना मुक्तपणे फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि एका क्षणी असे वाटत होते की ते ४२० किंवा ४३० धावांपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे, शेवटच्या क्षणी त्यांना २५-३० धावांवर रोखणे हे आमच्यासाठी बोनस होते.” गिल असं म्हणाला.

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?