Smriti Mandhana: कॅप्टन्सी मिळाल्यावर हरमनच्या डोळ्यात डोळेही घालू शकली नाही स्मृती मानधना? BCCI च्या मिटिंगमध्ये घडलं तरी काय?
हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता स्मृती मानधनाकडे भारतीय महिला संघाकडे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. यासाठी एक बीसीसीआय मिटिंग पार पडली होती, या मिटिंगमध्ये नेमके काय घडले ते पाहा...

Harmanpreet Kaur And Smirti Mandhana: हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनली आहे. नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघानी सुवर्णपदक जिंकले. यानंतर हरमनप्रीत कौरने तडकाफडकी निवृत्ती घेतली ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
स्मृती मानधना हिने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन्सीची ऑफर आल्यास मी तयार असल्याचं म्हटलं होते. ” गेल्या काही काळापासून त्या दोघींचे एकमेकांशी पटत नव्हते आणि त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये स्पष्ट अस्वस्थता निर्माण झाली होती”, अशी माहिती NDtv सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हरमनप्रीत कौरची कॅप्टन्सी ठेवायची होती, परंतु सिलेक्टर्सला पुढील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सायकलसाठी संघाची नव्याने बांधणी करायची आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीपर्यंत न पोहोचता सलग दोनदा बाहेर पडल्यानंतर, सिलेक्टर्स हरमनप्रीत कौरच्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करत होते.
पुढील वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी संघाची नव्याने बांधणी करण्याची वेळ आली आहे, असं निवडकर्त्यांना वाटतंय. यात ‘स्प्लिट कॅप्टन्सी’चा म्हणजेच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार हा कधीच नव्हता. अशी माहिती सुत्रांनी क्रिकबझला दिली आहे.
क्रिकबझ’ला मिळालेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौरला एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचे कर्णधारपद कायम ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता, परंतु तिने दोन्ही पदे सोडण्याचा निर्णय घेतला. आता हरमनप्रीत कौरने हा निर्णय रागात घेतला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्मृतीने कॅप्टन्सी मिळाल्यावर हरमनप्रीतचे तोंडभरुन कौतुक देखील केले. हरमनप्रीतने गेल्या काही वर्षांत दिलेल्या योगदानाची मी दखल घेऊ इच्छिते. तिने अत्यंत निष्ठेने संघाचं नेतृत्व केलं आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे, असं स्मृती म्हणाली.
बीसीसीआयची मिटिंग झाली, या मिटिंगनंतरच हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडले, या बैठकीत स्मृती हरमनशी नजरही मिळवू शकली नाही असं म्हटले जात आहे.
Follow Us
