AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, ‘या’ विषयावर चर्चा

टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला. विराट मंगळवारी भारतात परततोय. त्यामुळे या मीटिंगमध्ये महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.

Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, 'या' विषयावर चर्चा
| Updated on: Dec 21, 2020 | 1:09 PM
Share

अ‌ॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर (Team India) शानदार विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात दुखापतीमुळे मोहम्मद शमीला दुखापत झाली. दुखापतीमुळे शमी मालिकेबाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. भारतासाठी निघण्याआधी विराटने सहकाऱ्यांसोबत एक मीटिंग घेतली. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. special meeting was called by captain Virat Kohli before he left Australia

मीटिंगमध्ये काय घडलं?

विराट मंगळवारी (22 डिसेंबर) भारतात परतणार आहे. त्याने याआधी आज टीम सहकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्वात आधी टीम इंडियाला संबोधित केलं. मीटिंग आटोपल्यानंतर विराटने सर्व सहकाऱ्यांसह वैयक्तिक संवाद साधला. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात अपमानजनक पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियावर चहुबाजूने टीका करण्यात आली. यामुळे टीम इंडियाचं मानसिक खच्चीकरण झालं. या खच्चीकरणाचा परिणाम दुसऱ्या सामन्यावर होऊ नये. तसेच खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मनोधेर्य वाढवण्यासाठी ही मीटिंग घेण्यात आली होती. इनसाइड स्पोर्ट्सने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

विराटच्या घरी लवकरच लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती आहे. ती लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. या अशा वेळेस विराटला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. यामुळे विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराटनंतर अजिंक्य रहाणे उर्वरित 3 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. नेतृत्वाची जबाबदारी असल्याने अजिंक्यनेही विराटनंतर मीटिंग घेतली.

अजिंक्य काय म्हणाला?

विराटच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. यामुळे अजिंक्यने प्रत्येक सहाकाऱ्याला दुसऱ्या सामन्यात त्याची असलेली भूमिका आणि योगदान याबाबत कल्पना दिली. तसेच संवादही साधला. पहिल्या सामन्यात पराभवामुळे टीम इंडिया पिछाडीवर आहे. यामुळे मालिकेत पुनरागमन करण्याचं टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे.

विराट व्हॉट्सअपवरुन संवाद साधणार

विराट उर्वरित सामन्यांसाठी उपस्थित नसणार आहे. मात्र विराट यानंतरही टीम इंडियासोबत व्हॉट्सअपवरुन संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Icc Test Ranking : विराटची दादागिरी कायम, पुजाराची घसरण, आश्विनने कमावलं बुमराहने गमावलं

Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार

Australia vs India 2nd Test | दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी ‘या’ गोलंदाजाला कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार?

Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

special meeting was called by captain Virat Kohli before he left Australia

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.