AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Ashwin | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी, तरीही टी 20 मालिकेत संधी नाही, अश्विन म्हणतो….

टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) गेल्या काही वर्षांपासून टी 20 (T20) आणि एकदिवसीय क्रिकेटपासून (odi cricket) दूर आहे.

R Ashwin | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी, तरीही टी 20 मालिकेत संधी नाही, अश्विन म्हणतो....
टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) गेल्या काही वर्षांपासून टी 20 (T20) आणि एकदिवसीय क्रिकेटपासून (odi cricket) दूर आहे.
| Updated on: Mar 16, 2021 | 4:40 PM
Share

मुंबई : “आपल्या स्वत:ला स्वत:शीच स्पर्धा करण्याची आवश्यकता असते. मी निश्चितच स्वत:वर नियंत्रण मिळवलं आहे. मी जीवनात खूप काही शिकलो आहे. मला अनेकदा टी 20 आणि वनडे संघातील पुनरागमनाबाबतत विचारलं जातं. तेव्हा मला हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. मला लोकांच्या प्रश्नाबाबत काहीच चिंता वाटत नाही. लोकांनी कसे प्रश्न विचारावेत हा त्यांचा मुद्दा आहे. मी याबाबत फार विचार करत नाही. मी मैदानातून परतताना चेहऱ्यावर आनंद घेऊन परतण्याच्या प्रयत्नात असतो”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला. तो इंडिया टुडेसोबत बोलत होता. (Spinner R Ashwin reaction to his comeback to T20 and odi cricket)

अश्विन गेल्या काही वर्षांपासून टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटपासून दूर आहे. अश्विन कसोटीमध्ये निर्णायक भूमिका बजावतोय. त्याने नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टी 20 मालिकेत संधी मिळेल, अशी चर्चा सुरु होती. पण त्याला संधी मिळाली नाही.  त्यामुळे अश्विनला टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये केव्हा संधी देणार, असे प्रश्न विचारण्यात येत आहे. अश्विन गेल्या 4 वर्षांपासून टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला नाहीये.

अश्विनच्या कमबॅकबाबत विराट काय म्हणाला?

“कॅप्टन विराट कोहलीने अश्विनच्या टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. अश्विनला या निर्धारित षटकांच्या सामन्यात कोणतीच जागा नाही. वॉशिंग्टन सुंदर चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे आम्ही संघात एकाच प्रकारच्या खेळाडूंना एकाच वेळी खेळवू शकत नाही. तर्कहीन प्रश्न विचारु नयेत. तुम्हीच सांगा मी अश्विनला कुठे खेळवू. टीममध्ये तो कोणत्या ठिकाणी फीट आहे. प्रश्न विचारणं सोप्प आहे. पण त्याआधी आपल्याला प्रश्नामागील तर्क समजून घ्यायला हवा”, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

अश्विनची इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरी

अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या 4 कसोटीमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने बोलिंगसह बॅटिंगनेही आपला जलवा दाखवला होता. अश्विनने या मालिकेत एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.

भारताकडून सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार

अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. अश्विनने आतापर्यंत एकूण 29 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यापैकी त्याने 8 वेळा ‘मॅन ऑफ द सीरिजचा’ बहुमान मिळवला आहे. या यादीत टीम इंडियाकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर आहेत.

संबंधित बातम्या :

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य

(Spinner R Ashwin reaction to his comeback to T20 and odi cricket)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....