AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रुणाल पांड्याच्या खेळीची सुनील गावस्करांना भुरळ, म्हणाले, ‘या’ दोन कारणांमुळे त्याची खेळी महत्त्वाची!

लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी क्रुणालच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलंय. (Sunil Gavaskar Appriciate krunal pandya for Fantastic inning)

क्रुणाल पांड्याच्या खेळीची सुनील गावस्करांना भुरळ, म्हणाले, 'या' दोन कारणांमुळे त्याची खेळी महत्त्वाची!
krunal pandya And Sunil gavaskar
| Updated on: Mar 24, 2021 | 3:09 PM
Share

पुणे :  हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) यंगर ब्रदर क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) डेब्यू मॅचमध्ये पराक्रम केला. अवघ्या 26 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक जलद फिफ्टी ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे नोंद केला आहे. त्याच्या अफलातून बॅटींगने क्रिकेट रसिक प्रेक्षक भलतेच खूश झालेत. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना देखील क्रुणालच्या खेळीची भुरळ पडलीय. लिटील मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी क्रुणालच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलंय. (Sunil Gavaskar Appriciate krunal pandya for Fantastic inning Against England 1st one Day Match)

डेब्यू मॅचमध्ये अशी खेळी करणं अवघड

क्रुणालची पहिल्या सामन्यातली बॅटिंग बघून सुनील गावस्कर आनंदित झालेत. क्रुणालच्या बॅटिंगचं वर्णन गावस्कर यांनी शानदार आणि निडर अशा दोन शब्दात केलं आहे. स्टार स्पोर्ट्सवर कॉमेन्ट्री करताना गावस्कर म्हणाले, “आपल्याला हे विसरुन चालणार नाही की क्रुणाल त्याचा पदार्पणाचा सामना खेळतोय. पदार्पणाच्या सामन्यात अशी फलंदाजी करणं हे कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असतं. क्रीजवर पाय ठेवल्यापासूनच क्रुणालने मोठे फटके खेळायला सुरुवात केली जसं काय तो ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आला होता.”

क्रुणालच्या खेळात खेळभावना दिसली

क्रुणालच्या खेळात मला खेळभावना दिसली. कारण त्याने सुरुवातील आक्रमक फटके खेळून के.एल. राहुलवर असलेला दबाव झटकून टाकला. राहुल गेल्या काही मॅचपासून त्याच्या फॉर्मशी घगडत होता. त्याला एका चांगल्या खेळीची गरज होती. अशा परिस्थितीत क्रुणालने त्याला वेळ दिला आणि चांगले फटके खेळण्यास प्रोत्साहित केलं. सुरुवातीचा अडखळणाऱ्या राहुलचं प्रेशर त्याने आक्रमक फटके खेळून दूर केलं. क्रुणालने सुरुवातीला आक्रमक फटके खेळून राहुलचं काम सोपं केलं. हीच टीम भावना असते. आपल्या सहकारी खेळाडूवरचं प्रेशर कमी करणं आणि त्याला प्रोत्साहित करणं, या पलीकडे संघभावना काय असू शकते…?, असं म्हणत गावस्कर यांनी क्रुणालच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं.

क्रुणालचं पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक

कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीसने 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली.

हे ही वाचा :

Krunal Pandya : क्रुणाल पांड्याचा झंझावात, 283 बॉलमध्ये 375 रन्स, मैदानाला आग लावली!

Ind Vs Eng : क्रुणाल पांड्या आणि टॉम करनमध्ये असं काय झालं?, ज्यामुळे विराट कोहलीही हैरान, पाहा व्हिडीओ…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.