Kieron Pollard | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी कायरन पोलार्डचा धमाका, अवघ्या 3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स

कायरन पोलार्डने (Kieron Pollard) अखेरच्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत शानदार कामगिरी केली.

Kieron Pollard | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी कायरन पोलार्डचा धमाका, अवघ्या 3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स
कायरन पोलार्ड

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याआधी सर्व खेळाडू जोरदार सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने (Kieron Pollard) वेस्टइंडिजमध्ये सुरु असलेल्या Super50 Cup स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. पोलार्डने अवघ्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत शानदार 5 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह पोलार्डने आयपीएलसाठीही सज्ज असल्याचं या खेळीतून दाखवून दिलं आहे. (super 50 cup Trinidad Tobago captain kieron pollard takes 5 wickets against barbados)

पोलार्डने नक्की काय केलं?

वेस्टइंडिजमध्ये सध्या Super50 Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 फेब्रुवारीला Barbados विरुद्ध Trinidad&Tobago मध्ये या स्पर्धेतील 8 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात त्रिनिदादचा कर्णधार पोलार्डने टॉस जिंकून बार्बाडोसला बॅटिंगला भाग पाडले. पोलार्डने फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. कर्णधार म्हणून पुढे येत पोलार्डने लीड केलं.

पोलार्डचा ‘पंच’

पोलार्डने आपल्या 3 ओव्हरच्या स्पेलमध्ये 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. पोलार्डने 48 व्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेस, जेसन होल्डर आणि डोमिनिक ड्रेक्सला आऊट केलं. तर 50 व्या ओव्हरमध्ये अॅशले नर्स आणि टेव्हिन वॉलकोटला आऊट केलं. पोलार्डने अखेरच्या काही ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्याने बार्बाडोसला निर्धारित 50 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 253 धावाच करता आल्या. त्यामुळे त्रिनिदादला विजयासाठी 254 धावांचे आव्हान मिळाले.

आता वेळ होती विजयी आव्हानाचे पाठलाग करण्याची वेळ होती. पोलार्डकडून बोलिंगनंतर दमदार बॅटिंगची अपेक्षा होती. मात्र पोलार्डने बॅटिंगने निराशा केली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र जेसन मोहम्मदची 122 धावांच्या शतकी खेळी आणि सलामीवीर एव्हिन लेव्हिसच्या 61 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्रिनिदादने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 5 चेंडूंआधी हा सामना जिंकला. शतक लगावणारा जेसन ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

संबंधित बातम्या :

नागालँडचा एकलव्य, शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहून फिरकी शिकला, आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज

अवघ्या 5 तासाच उरकला कसोटी सामना, गोलंदाजाची कमाल, विश्व विक्रमाला गवसणी

(super 50 cup Trinidad Tobago captain kieron pollard takes 5 wickets against barbados)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI