Arjun Tendulkar : ज्या अर्जुनला अख्खा सीजन बेंचवर बसवलं, त्याने संधी मिळताच क्षमता दाखवून दिली, श्रेयस अय्यरच्या टीमला फटका
Arjun Tendulkar : आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरला अख्खा सीजन बेंचवर बसवून ठेवलं. पण T20 मुंबई लीगमध्ये संधी मिळताच अर्जुन तेंडुलकरने आपली क्षमता दाखवून दिली. त्याने डायरेक्ट विराट कोहलीच्या स्टाइलमध्ये मॅच फिनिश केली.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो. आयपीएल 2026 आधी सुद्धा अशीच अर्जुन तेंडुलकरची चर्चा होती. यावेळी तो मुंबई इंडियन्स ऐवजी लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये होता. पण अर्जुन तेंडुलकरच अस्तित्व संपूर्ण सीजनमध्ये कुठे जाणवलचं नाही. अर्जुन तेंडुलकरला संधीसाठी दीर्घ प्रतिक्षा करावी लागली.अखेर त्याला शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून संधी मिळाली. पण त्याआधीच लखनऊ टीमचं स्पर्धेतून पॅकअप झालं होतं. IPL चा अख्खा सीजन अर्जुन तेंडुलकरने बेंचवर बसून काढला. पण T20 मुंबई लीगच्या पहिल्याच सामन्यात संधी मिळताच अर्जुनने आपली क्षमता दाखवून दिली. अर्जुनने खणखणीत षटकार ठोकून टीमला विजय मिळवून दिला. अर्जुनने या सामन्यात चेंडू आणि बॅटने थोडं पण महत्वपूर्ण योगदान दिलं.
T20 मुंबई लीगमध्ये अर्जुन तेंडुलकर अंधेरी टीमकडून खेळत आहे. शिवम दुबे या टीमचा कॅप्टन आहे. अंधेरीचा सोबो फालकन्स विरुद्ध सामना झाला. अर्जुन तेंडुलकरने एक विकेट घेतला आणि शेवटी सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सोबो फालकन्सची टीम 126 रन्सवर ऑलआऊट झाली. अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात 3 ओव्हरमध्ये 21 धावा देत एक विकेट काढला.
आयपीएल फायनलच्या अंदाजात मॅच संपवली
फलंदाजीची अर्जुनला संधी मिळाली, तेव्हा फार काही करण्याची आवश्यकता नव्हती. कारण टीमच्या टॉप आणि मिडल ऑर्डरने आपलं काम चोख करुन ठेवलेलं. 14 ओव्हरमध्ये 119 धावांवर पाचवी विकेट गेली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री झाली. अर्जुनने आपल्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर तो स्ट्राइकवर आला आणि विराट कोहलीच्या आयपीएल फायनलच्या अंदाजात मॅच संपवली. अर्जुनचा हा सिक्सर विजयी षटकार ठरला. अंधेरीच्या टीमने 5 विकेट राखून हा सामना जिंकला.
फालकन्सची हालत खराब
याआधी कॅप्टन शिवम दुबे आणि अजय मिश्राने प्रत्येकी 3-3 विकेट काढून फालकन्सची हालत खराब केली. टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यर सुद्धा 7 चेंडूत फक्त 5 धावा काढून बाद झाला. आदित्य तरेच्या 59 धावांमुळे टीमला 126 धावांपर्यंत पोहोचता आलं. त्यानंतर अंधेरीचा ओपनर दिव्यांश सक्सेनाने 50 धावा करुन टीमच्या विजयाचा पाया रचला.