AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले, 24 ट्रेनचे मार्ग बदलले, 16 गाड्या रद्द

उत्तर प्रदेशमध्ये मालगाडीचे 6 डबे रुळावर घसरल्याची घटना घडली. या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

मोठी बातमी! मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले, 24 ट्रेनचे मार्ग बदलले, 16 गाड्या रद्द
| Updated on: Jul 21, 2026 | 1:32 PM
Share

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद-नवी दिल्ली मार्गावर एका मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना साहिबाबाद रेल्वे स्टेशनपासून 400 मीटर अंतरावर घडली. या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु या घटनेमुळे हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. मालगाडीचे डबे घसरल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मालगाडीचे डबे घसरण्याची घटना मंगळवारी रात्री दोन वाजता घडली. कोसळा असलेल्या मालगाडीचे एकूण 6 डबे रुळावरून घसरले. या घटनेने रेल्वे विस्कळीत झाली असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रेल्वे अधिकारी क्रेनच्या मदतीने डबे हटवण्याचे काम करत आहेत. रेल्वे लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मालडबे घसरल्याने अनेक ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या घटनेचा तब्बल 53 रेल्वे सेवांना फटका बसला आहे. तर यापैकी 24 गाड्या दिल्ली-दिल्ली मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 16 पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर 5 पॅसेंजर गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. 8 ट्रेन विविध स्टेशनवरून नियंत्रित करण्यात आल्या आहेत. यात आनंद विहारच्या काही ट्रेनचा समावेश आहे.

मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे विस्कळीत 

या घटनेमुळे दिल्ली, नोएडा, गाझियाादमधील हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रवासी पर्यायी ट्रेनने प्रवास करू लागले आहेत. ट्रेन रद्द झाल्याने काही प्रवाशांनी मेट्रो,बस आणि खासगी वाहनांचा आधार घेतला. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत. आता घटनास्थळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वेचे इंजिनीअरिंग आणि टेक्निकल टीमने घटनास्थळी काम सुरू केलं आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अपडेट देखील दिले जात आहेत. अनेक प्रवासी रेल्वे सेवा कधी सुरळीत होईल, याची वाट पाहत आहेत.

Follow Us
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका