T20 WC : पाकिस्तान किंवा इंग्लंड, कोणाच्या खात्यात जाणार 13 करोड रुपये
उद्या मेलबर्नच्या मैदानात जी टीम चांगला खेळ करेल, त्या टीमला विजय होईल

मुंबई : ऑस्टेलियातील (Australia) मेलबर्नमध्ये उद्याची फायनल मॅच (Final Match) होणार आहे. दुपारी दीडवाजल्यापासून चाहत्यांना पाकिस्तान (PAK) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या मॅचची आतापासून चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. इंग्लंड टीमने उद्याच्या मॅचसाठी टीममध्ये बदल केला आहे. मार्क वुड आणि डेविड मलान या दोन खेळाडूंना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडू बाहेर बसवणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
उद्या मेलबर्नच्या मैदानात जी टीम चांगला खेळ करेल, त्या टीमला विजय होईल. उद्याच्या मॅचमध्ये विजयी होणाऱ्या टीमला 13 करोड रुपये मिळणार आहेत. यावेळी T20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 45.68 कोटी रुपये आहे. उपविजेत्या टीमला 6 करोड रुपये मिळणार आहेत. टीम इंडिया आणि न्यूझिलंड टीमला प्रत्येकी 32.63 लाख रुपये मिळतील.
इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कॅरेन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि नसीम शाह
