VIDEO : ‘मोहम्मद आमिर ढोंगी बाबा…’, नवजोत सिंग सिद्धू भडकले, पाकिस्तानी क्रिकेटवर आगपाखड

भारतीय संघ टी 20 वर्ल्डकपची सेमीफायनल गाठू शकणार नाही असं भाकित मोहम्मद अमीरने केलं होतं. मात्र सेमीफायनलमध्ये भारत पोहोचलाच. त्यानंतर त्याने आणखी एक विधान केलं, इंग्लंड उपांत्य फेरीत भारताला हरवेल. पण त्याची ही भविष्यवाणीही चुकीची ठरली आहे.त्यानंतर नवजोत सिंग सिद्धू त्याच्यावर भडकला असून त्यांनी चांगलीच धुलाई केली.

VIDEO : मोहम्मद आमिर ढोंगी बाबा..., नवजोत सिंग सिद्धू भडकले, पाकिस्तानी क्रिकेटवर आगपाखड
नवजोत सिंह सिद्धूने पाकिस्तानी क्रिकेटरला फटकारलं
Image Credit source: social media
| Updated on: Mar 06, 2026 | 11:52 AM

टी 20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लडला हरवून भारताने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी, सेलिब्रिटीही आनंदात आहेत. मात्र या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे मात्र चिडले आहेत.. पण भारतीय संघावर नव्हे तर पाकिस्तानी खेळाडूवर. सिद्धू यांनी पाकिस्तानी खएळाडू मोहम्मद आमिरवर जोरदार टीकास्त्र सोडलं असून त्याला “ढोंगी बाबा” म्हटलंय. भारताच्या विजायनंतर सिद्धू यांनी माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजावर टीकास्त्र सोडलं.

काल वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. त्यानंतर, नवज्योत सिंग सिद्धू यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आमिरच्या भाकितांवर निशाणा साधत त्याचा खपसू समाचार घेतला. भारत या स्पर्धेच फार पुढे जाणार नाही असं भाकीत पाकिस्तानी खेळाडूने केलं होतं.

नवजोत सिंग सिद्धूचा मोहम्मद आमिरवर निशाणा

“काही लोकांना खोटं भाकित करण्याची सवय असते. जर त्यांचे भाकितं बरोबर निघालं तर ते शहाणे असल्याचा दावा करतात, परंतु जर ते चुकीचे निघालं तर तो केवळ अंदाज होता, असं म्हणून ते फेटाळून लावतात” असं सिद्धू म्हणाले. सामन्याचं भवितव्य भाकितावरून नव्हे तर मैदानावरच ठरवले जाते, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

 

“हे लोक स्वतःला खूप मोठं समजतात. सुरुवातीला असं म्हटले गेले की भारतीय संघ पात्रताही मिळवू शकणार नाही, उपांत्य फेरीत पोहोचणं तर दूरच. नंतर त्याने असं म्हटलं की, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका पुढे जातील. पण दोन्ही संघ बाहेर पडले. इंग्लंड उपांत्य फेरी जिंकेल असही विधान त्याने केलं, पण तेही हरले.” असं सिद्धू यांनी सुनावलं. त्यांचा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय.

विजयानंतर पलटी

यापूर्वी, मोहम्मद अमीरने भाकीत केलं होते की टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला उपांत्य फेरी गाठण कठीण जाईल. पुढे जाऊन तर त्याने सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. मात्र, भारताच्या विजयानंतर त्याने घूमजाव केलं. इंग्लंड सामना जिंकू शकला असता, परंतु एका महत्त्वाचा कॅच सोडल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. जर हॅरी ब्रूकने संजू सॅमसना कॅच पकडला असात तर इंग्लंडचा संघ त्यांचं लक्ष्य गाठू शकला असता, असे आमिर म्हणाला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट खेळला आणि विजयाचे श्रेय त्यांनाच जातं, असंही त्यान मान्य केलं.

काल झालेल्या सेमीफायनलमध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या, जी टी20 विश्वचषकातील नॉकआऊट फेरीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. संजू सॅमसनने 42 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावा करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

Follow Us