Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर

टीम इंडियाचे 3 खेळाडूंना दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. त्यात या स्टार खेळाडूला ही मुकावे लागले आहे. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर
रवींद्र जाडेजा

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरी कसोटी खेळणाऱ्या टीम इंडियासाठी (Aus vs Ind 3rd Test) वाईट बातमी आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. रवींद्र जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं आहे. यामुळे जाडेजाची चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची चिन्ह आहेत. दरम्यान याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (team india big blow ravindra jadeja ruled out of test series against due to thumb injury)

PTIनुसार, दुखापतीनंतर जाडेजाच्या बोटाचं स्कॅन करण्यात आलं. यामध्ये अंगठ्याची हड्डी सरकरल्याचं निदान झालं आहे. तसेच फ्रॅक्चरही झालं आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सू्त्रांनुसार सांगितले की, ” जाडेजाला या दुखापतीमुळे हातात ग्लोवज घालून फलंदाजी करण्यास त्रास होत आहे.” यामुळे जाडेजाचं चौथ्या कसोटीला मुकण्याची तीव्र शक्यता आहे. या दुखापतीमुळे जाडेजाला किमान 3-4 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते.

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जाडेजाला ही दुखापत झाली. स्टार्कने टाकलेल्या शॉर्ट पिच बोलवर जाडेजाने हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडूने उसळी घेतली. यामुळे जाडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली.

बोटाला चेंडू लागल्याने जाडेजाला वेदना झाली. यानंतर टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल मैदानात धावत आले. पटेल यांनी जाडेजाच्या अंगठ्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र या दुखापतीमुळे जाडेजाला पुढे खेळ सुरु ठेवता आला नाही. यामुळे जाडेजा 28 धावांवर नाबाद परतला.

या दुखापतीनंतर जाडेजा दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी हाताला पट्टी बांधून उतरला. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रशिक्षक आणि फिजीओंसोबत चर्चा केली. यानंतर जाडेजाला मैदानाबाहेर पाठवण्यात आले.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत

(team india big blow ravindra jadeja ruled out of test series against australia due to thumb injury)

Published On - 6:13 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI