कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी उरकला, शास्त्री सरांचा स्वत:च्या व्हायरल मीम्सवर भन्नाट रिप्लाय, म्हणाले..

रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचं ट्विट शेअर करत भन्नाट रिप्लाय दिला आहे.

कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी उरकला, शास्त्री सरांचा स्वत:च्या व्हायरल मीम्सवर भन्नाट रिप्लाय, म्हणाले..
रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचं ट्विट शेअर करत भन्नाट रिप्लाय दिला आहे.

अहमदाबाद : टीम इंडियाने (Team India) इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना अवघ्या दुसऱ्याच दिवशी निकाली निघाला. सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावरही काही भन्नाट आणि विनोदी मीम्स व्हायरल झाले. चक्क शास्त्री यांनीच आपला फोटो असलेला मीम्स शेअर करत भन्नाट रिप्लाय दिला आहे. (team india head coach ravi shastri react meme)

एका युझर्सने रवी शास्त्रींचा फोटो वापरुन एक मीम्स बनवलं. या मीम्समध्ये “तुम्हाला काय वाटलं मॅच जिंकल्यावरही ड्राय स्टेटमध्ये मी राहू शकेल? असं मजकूर होता. हे मीम प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केलं. तसंच यामध्ये त्यांनी रवी शास्त्री यांना टॅग (मेन्शन) केलं. यानंतर शास्त्री यांनी हे ट्विट शेअर करत भन्नाट रिप्लाय दिला. “असे मीम्स मला आवडतात. या कठीण प्रसंगात अनेकांच्या चेहऱ्यांवर माझ्यामुळे हसू आले. त्यामुळे मी आनंदी आहे” असं शास्त्रींनी ट्विट केलं आहे.

नेमकं शास्त्रींनाच ट्रोल का केलं?

तिसरी कसोटी गुजरातमधील अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. गुजराज ड्राय स्टेट आहे. म्हणजेच संपूर्ण गुजरातमध्ये दारु विक्रीवर बंदी आहे. शास्त्री यांना अनेकदा दारुवरुन ट्रोल करण्यात येतं. सामना अवघ्या दुसऱ्याच दिवशी संपल्याने शास्त्री उर्वरित दिवस कसे काढणार, या अर्थाने हे मीम्स करण्यात आले होते. दरम्यान या मीममुळे नेटीझन्सही आनंदी आहेत.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

बुमराहची माघार

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. बुमराहने वैयक्तिक कारणामुळे चौथ्या टेस्टमधून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे बुमराहने सुट्टीची मागणी केली होती, यामुळे त्याला रजा मंजूर करण्यात आली आहे, असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे आता बुमराह चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

India vs England | इंग्लंडला पराभवानंतर मोठा धक्का, स्टार खेळाडू मायदेशी परतणार

Ravi Shastri | जेव्हा रवी शास्त्री 120 वर्षांचे झाले…

(team india head coach ravi shastri react meme)

Published On - 7:07 pm, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI