Shardul Thakur | आधी लोकलने पालघरला पोहोचला, आता थेट महिंद्राची भारदस्त कार भेट, शार्दूल ठाकूर म्हणतो…

ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India) युवा खेळाडूंना आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी (THAR SUV) भेट देणार असल्याची घोषणा केली होती.

Shardul Thakur | आधी लोकलने पालघरला पोहोचला, आता थेट महिंद्राची भारदस्त कार भेट, शार्दूल ठाकूर म्हणतो...
शार्दुल ठाकूर आणि आनंद महिंद्रा

मुंबई : “महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी बक्षिस म्हणून (THAR-SUV) भेट दिली, यामुळे मी फार आनंदी आहे. तुमच्या सारखी प्रतिष्ठीत व्यक्ती मला ओळखते, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. तुम्ही दिलेल्या बक्षिसासाठी मी तुमचा आभारी आहे, अशा शब्दात टीम इंडियाचा वेगावान गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याने ट्विटद्वारे आनंद महिंद्राचे आभार मानले आहेत. (team india shardul thakur thanked Anand Mahindra for gift THAR SUV)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात या खेळाडूंनी महत्वाचं योगदान दिलं. यामुळे महिंद्रा यांनी या 6 खेळाडूंना (THAR-SUV) भेट देणार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. महिंद्रा यांनी शुबमन गिल (Subaman Gill), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), नवदीप सैनी (Navdeep Saini) , थंगारासू नटराजन (Thanagarasu Natarajan) , मोहम्मद सिराज(Mohhamad Siraj) आणि वॉशिंग्टन सुंदर (washington sundar) या 6 नव्या दमाच्या खेळाडूंना THAR-SUV भेट देणार असल्याची घोषणा केली होती. (team india shardul thakur thanked Anand Mahindra for gift THAR SUV)

शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीत निर्णायक भूमिका बजावली. त्याने गोलंदाजी करताना पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीनेही झुंजार खेळी केली. त्याने पहिल्या डावात वॉशिंग्टन सुदंरसह सातव्या विकेटसाठी 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलने एकूण 115 चेंडूत 2 सिक्स आणि 9 फोरसह 67 धावांची खेळी केली.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत संधी

ऑस्ट्रेलियाविरोधात चौथ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. या कामगिरीचं बक्षिस त्याला मिळालं आहे. शार्दुलची इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारत दौऱ्यात इंग्लंड कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या

Team India | महिंद्राचा धमाका, टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना भारदस्त THAR-SUV भेट देणार

“लोकलमध्ये सीट मिळवणं हे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड”, शार्दुल ठाकूरची मिश्किल प्रतिक्रिया

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

(team india shardul thakur thanked Anand Mahindra for gift THAR SUV)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI