“लोकलमध्ये सीट मिळवणं हे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड”, शार्दुल ठाकूरची मिश्किल प्रतिक्रिया

लोकलमध्ये सीट मिळवणं हे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड, शार्दुल ठाकूरची मिश्किल प्रतिक्रिया
'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूर

शार्दुलच्या यशस्वी क्रिकेटपटु होण्यात मुंबई लोकलचं महत्वाचं योगदान राहिलं आहे.

sanjay patil

|

Jan 22, 2021 | 8:44 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा (Australia Cricket Team) सामना करण्यापेक्षा मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) जागा मिळवणं अवघड असंत, अशी मिश्किल प्रतिक्रिया टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) दिली. कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करणं कठीण की लोकलमध्ये जागा मिळवणं, असा प्रश्न शार्दुलला विचारण्यात आला. यावर शार्दुलने वेळ न दवडता हे मिश्किल उत्तर दिलं. शार्दुलने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता. या मुलाखतीत शार्दुलने दिलखुलास गप्पा मारल्या. (Getting a seat in the local is harder than facing Kangaroos bowling said shardul thakur)

शार्दुल ठाकूर मुळचा पालघरमधील माहिम गावाचा रहिवाशी. त्यामुळे शार्दुलला अनेकदा अवजड क्रिकेट कीटसह सरावासाठी मुंबईत यायला लागायचे. अशा वेळेस त्याला रेल्वेशिवाय पर्याय नसायचा. शार्दुलच्या यशस्वी क्रिकेटपटु होण्यात मुंबई लोकलचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. शार्दुलसाठी लोकल हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे.

शार्दुलला तब्बल 2 वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरी कसोटी मॅच खेळण्याची संधी मिळाली. शार्दुलचा ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला. शार्दुलला दुसऱ्या संधीसाठी 2 वर्षांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागली. याबद्दल शार्दुलने प्रतिक्रिया दिली. या दोन सामन्यामध्ये अधिक काळ लोटला. या दरम्यान माझ्यात खूप बदल झाले. त्यावेळेस माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे संधी कधी मिळणार याची वाट पाहत बसणं किवा मग कठोर परिश्रम करणं. मी मेहनत करण्याचा निर्णय घेतला. माझे वडील शेतकरी आहेत. वडिलांनी मला मेहनत करायला शिकवलं आहे. पीक वाया गेलं म्हणजे दुसऱ्यांदा शेती करायची नाही असं नसतं. हेच सूत्र क्रिकेटबाबतीतही लागू होतं, असं शार्दुल म्हणाला.

चौथ्या सामन्यात निर्णायक कामगिरी

रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने शार्दुलला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. शार्दुलने या संधीचं सोनं केलं. शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीत बॅटिंग आणि बोलिंगने निर्णायक भूमिका बजावली. त्याने वॉशिंग्टंन सुंदरसह पहिल्या डावात 7 व्या विकेटसाठी 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. शार्दुलने पहिल्या डावात 67 धावांची खेळी केली. तर एकूण 2 डावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

Shardul Thakur | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचे माहिम गावात जंगी स्वागत,आईकडून औक्षण

Shardul Thakur ऑस्ट्रेलियाविरोधातील ऐतिहासिक मालिका विजयानंतर शार्दुल ठाकूर धोनीबद्दल काय म्हणाला?

(Getting a seat in the local is harder than facing Kangaroos bowling said shardul thakur)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें