AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचे माहिम गावात जंगी स्वागत,आईकडून औक्षण

शार्दुलचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर अनेक क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूरचे माहिम गावात जंगी स्वागत,आईकडून औक्षण
शार्दुल ठाकूर आणि त्याची आई.
| Updated on: Jan 21, 2021 | 3:25 PM
Share

पालघर : टीम इंडियाचा (Team India) वेगवाग गोलंदाज शार्दुल ठाकूरचं  (Shardul Thakur) पालघरमधील माहिममध्ये राहत्या घरी गावातील रहिवाशांनी शार्दुलचं टाळया वाजवून जंगी स्वागत केलं. यावेळेस शार्दुलला त्याच्या आईने ओवाळलं. आपल्या मुलाने देशासाठी मोठी कामगिरी केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. (after his historic victory over australia shardul thakur was welcomed in mahim village in palghar)

ऑस्ट्रेलियावर शानदार कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज भारतात परतली. यावेळेस टीम इंडियाच्या खेळाडूंचं शानदार स्वागत करण्यात आलं. विमानतळावरुन शार्दुल आपल्या पालघरसाठी निघाला. आपल्या सुपूत्राचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण पालघरमधील नागिरकांनी शार्दुलच्या घराबाहेर एकच गर्दी केली. घरी परतल्यानंतर शार्दुलच्या आईनी त्याचे ओक्षण केलं. यावेळेस त्याना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. यानंतर शार्दुलने केक कापून गावकऱ्यांसह या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला. शार्दुलने आपल्या आई वडिलांना केक भरवला. तसेच शार्दुलने उपस्थित असलेल्या गावकऱ्यांसह फोटोही काढले.

चौथ्या सामन्यात निर्णायक कामगिरी

शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीत निर्णायक भूमिका बजावली. त्याने गोलंदाजी करताना पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीनेही झुंजार खेळी केली. त्याने पहिल्या डावात वॉशिंग्टन सुदंरसह सातव्या विकेटसाठी 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलने एकूण 115 चेंडूत 2 सिक्स आणि 9 फोरसह 67 धावांची खेळी केली.

ढोल-ताशांचा गजरात रहाणेचं स्वागत

टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं.अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी अजिंक्यची सोसायटीच नव्हे तर संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब बनलं होतं. आपल्या कुटुंबातील विजयीवीर परततोय, त्याच आवेशात त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अजिंक्य रहाणेची चिमुकली लेक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. बापाला पाहून चिमुकल्या अजिंक्य रहाणेला बिलगली.

संबंधित बातम्या :

Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

(after his historic victory over australia shardul thakur was welcomed in mahim village in palghar)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.