Team India | महिंद्राचा धमाका, टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना भारदस्त THAR-SUV भेट देणार

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:00 PM, 23 Jan 2021
Team India | महिंद्राचा धमाका, टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना भारदस्त  THAR-SUV भेट देणार
टीम इंडियाचे युवा खेळाडू

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India)  युवा खेळाडूंना महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) गाडी  भेट देणार आहेत. महिंद्रा या खेळाडूंना (Mahindra THAR-SUV) गाडी गिफ्ट म्हणून देणार आहेत. स्वत: आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. महिंद्रा हे शुबमन गिल (Subaman Gill) , शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), नवदीप सैनी (Navdeep Saini) , थंगारासू नटराजन (Thanagarasu Natarajan) , मोहम्मद सिराज(Mohhamad Siraj) आणि वॉशिंग्टन सुंदर (washington sundar)  या 6 युवा खेळाडूंना THAR-SUV भेट देणार आहेत. यामुळे या युवा खेळाडूंचे मनोबल आणखी वाढले आहे. (Anand Mahindra to gift THAR SUV to the six youngsters of the Indian team)

ऑस्ट्रेलियाविरोधात युवा ब्रिगेडची कामगिरी

टीम इंडियाच्या या 6 युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरोधात महत्वाची भूमिका बजावली. अनेक अनुभवी खेळाडू हे दुखापतग्रस्त होते. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. एकूण परिस्थिती प्रतिकूल होती. या 6 पैकी 5 खेळाडूंनी या मालिकेतून कसोटी पदार्पण केलं. पाठीशी कोणताही अनुभव नसताना बलाढ्य कांगारुंना युवा ब्रिगेडने कांगारुंना पाणी पाजलं.

शुबमन गिलने या संपूर्ण मालिकेतील 6 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 257 धावा केल्या. त्याने चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात 91 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गिलने दुसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं होतं.

चौथ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने निर्णायक कामगिरी केली. या दोघांनी पहिल्या डावात सातव्या विकेटसाठी 123 धावांची विक्रमी भागीदारी केली. शार्दुलने या चौथ्या सामन्यात एकूण 69 धावा केल्या. तसेच 7 विकेट्स घेतल्या. तर सुंदरने पदार्पणातील सामन्यात पहिल्या डावात 62 तर दुसऱ्या डावात 22 धावांची खेळी केली. तसेच 4 खेळाडूंना माघारी पाठवलं.

थंगारासू नटराजनने या चौथ्या सामन्यात एकूण 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय ठरला. त्याने या मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या. नवदीप सैनीने तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. त्याने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. मात्र चौथ्या सामन्यातील दुखापतीमुळे त्याला विकेट घेण्यात यश आले नाही.

महिंद्रा हे नेहमीच अनेक खेळाडूंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. त्यांनी खेळाडूंना भेट देण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधी 2007 मध्ये बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला 2017 मध्ये सीरिज टायटल जिंकलं होतं यानिमित्ताने महिंद्रा यांनी श्रीकांतला TUV 300 भेट दिली होती.

संबंधित बातम्या :

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ

Mohammed Siraj BMW | Platina ते BMW, रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप

(Anand Mahindra to gift THAR SUV to the six youngsters of the Indian team)