Harmanpreet Kaur : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने कोणाची माफी मागितली?
ICC Womens World Cup Final 2025 : मागच्या दोन दशकापेक्षा पण अधिक काळापासून असलेलं महिला वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताच स्वप्न अखेर साकार झालं. भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेला हरवून नवीन इतिहास रचला. या आनंदाच्या क्षणी टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने कोणाची माफी मागितली?.

Womens World Cup Final : भारतीय महिला टीमचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अखेर 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडिअमरवर साकार झालं. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर टीम इंडियाच्या महिलांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. या दरम्यान त्यांनी आपल्या सेलिब्रेशनमध्ये माजी भारतीय महिला क्रिकेटपटुंना सहभागी करुन घेतलं. कॅप्टन हरमनप्रीत कौरने या दिग्गज खेळाडूंना ट्रॉफी देताना म्हटलं की, दीदी हे तुमच्यासाठी होतं. यावेळी भारतीय कॅप्टनने कोणाची तरी माफी सुद्धा मागितली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल ICC चे अध्यक्ष जय शाह यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर हरमनप्रीत कौरने सर्वात आधी टीमच्या खेळाडूंसोबत सेलीब्रेशन कलं. या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात भारतीय कॅप्टन हरमनप्रीत माजी भारतीय खेळाडू अंजुम चोपडा, मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांन वर्ल्ड कप ट्रॉफी देताना दिसते. या दिग्गज महिला खेळाडूसुद्धा भावूक झाल्या होत्या.
त्यासाठी माफी मागतो
हा एक आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण होता, ज्यावेळी सर्व खेळाडूंनी या दिग्गजांची गळाभेट घेतली. यावेळी हरमनप्रीत म्हणाली की, ‘दीदी हे तुमच्यासाठी होतं’. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना झूलन गोस्वामीला म्हणाले की, “मागच्यावेळी तुमच्यासाठी आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही. त्यासाठी माफी मागतो” या प्रसंगी सर्व खेळाडू भावनिक झालेल्या. झूलन गोस्वामीने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
झूलन गोस्वामी काय म्हणाली?
भारतीय महिला टीमने वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवल्यानंतर माजी दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामी खूप इमोशनल झालेली. तिने सोशल मिडिया एक्सवर लिहिलय की, “हे माझं स्वप्न होतं. तुम्ही ते साकार केलय. शेफाली वर्माच्या 70 धावा आणि दोन विकेट, दीप्ती शर्माचं अर्धशतक आणि पाच विकेट…दोघींची पण कमाल. ट्रॉफी आता आपल्याकडे आहे”
Champions of the World 💙🇮🇳
I’ve seen this dream for over two decades, to watch the Indian women lift that World Cup trophy.
Tonight, that dream finally came true.
From the heartbreak of 2005 to the fight of 2017, every tear, every sacrifice, every young girl who picked up a… pic.twitter.com/MgClC7QE9J
— Mithali Raj (@M_Raj03) November 2, 2025
भारतीय क्रिकेटसाठी धडधडणारं प्रत्येक ह्दय जिंकलं
टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजने सुद्धा एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या. “भारतीय महिलांना वर्ल्ड कप ट्रॉफी उचलताना पाहणं हे माझं गेल्या दोन दशकापासूनच स्वप्न आहे. आज रात्री ते स्वप्न साकार झालं. वर्ष 2005 मध्ये मन मोडण्यापासून ते 2017 च्या संघर्षापर्यंत. प्रत्येक अश्रू, प्रत्येक बलिदान, प्रत्येक युवा मुलीने हे मानून बॅट उचलली की, मी इकडचीच आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या नव्या चॅम्पियन्स, तुम्ही फक्त ट्रॉफी जिंकलेली नाही, तर भारतीय क्रिकेटसाठी धडधडणारं प्रत्येक ह्दय जिंकलं आहे. जय हिंद” अशा शब्दात मिताली राजने आपल्या भावना व्यक्त केल्या.
