Womens World Cup 2025 : ‘डायमंड ज्वेलरी आणि अजून…’, महिला क्रिकेट टीमच्या WC विजयानंतर ‘या’ भाजप खासदाराकडून मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा
Womens World Cup 2025 : जेव्हा महिला स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा त्या काहीही साध्य करू शकतात... महिला क्रिकेट टीमच्या WC विजयानंतर या भाजप खासदाराकडून मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा

Womens World Cup : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे… रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2025 सामन्यात भारताच्या मुलींनी मोठा विक्रम रचला आहे. भारतीय महिला संघाने पहिल्यांगाच एकदिवसीय विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं आहे. संपूर्ण देशात फक्त महिला क्रिकेटपटूंची चर्चा सुरु असताना राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांनी विजयी संघाला मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने भेट देण्याची घोषणा तर केलीच, पण त्यांच्या घरी सौर छतावरील प्रणाली बसवण्याची इच्छाही व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद ढोलकिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र लिहित इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, ‘भारतीय महिला क्रिकेटपटूंनी फक्त भारताच नाव रोशन केलं नाही तरस दाखवून दिलं आहे का स्त्री शक्ती काहीही करु शकते…’
गोविंद ढोलकिया पुढे म्हणाले, ‘विश्वचषक जिंकणे हे केवळ क्रीडा क्षेत्रातील यश नाही, तर ते या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की जेव्हा महिला स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा त्या काहीही साध्य करू शकतात. त्यांचा हा विजय भविष्यातील अनेक मुलींना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देईल.’ असं देखील गोविंद म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद ढोलकिया याच्या प्रस्तावावर बीसीसीआयने अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही… पण सोशल मीडियावर क्रिकेट चाहते ढोलकिया यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. गोविंद ढोलकिया हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी 11 कोटी रुपये दान केले होते. एवढंच नाही तर, ढोलकिया यांनी त्यांच्या स्टाफला कार आणि घर यांसारख्या मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
भारताने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये 2 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. भारताने 299 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 246 रन्सवर रोखलं. भारत यासह वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणाऱ्या शेफाली वर्मा हीला वूमन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. या विजयानंतर संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे.
