CoA Meeting LIVE : भारत-पाक मॅच होणार की नाही? नागपूरच्या थोडगेंची महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच क्रिकेट विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशीही मागणी पुढे आली. भारत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांची समितीची (COA) नवी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे. अवघ्या …

CoA Meeting LIVE : भारत-पाक मॅच होणार की नाही? नागपूरच्या थोडगेंची महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच क्रिकेट विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशीही मागणी पुढे आली. भारत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांची समितीची (COA) नवी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे.

अवघ्या काही महिन्यात क्रिकेट विश्वचषक 2019 ला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 16 जूनला मँचेस्टर इथं होणार आहे. मात्र हा सामना खेळू नये, कारण क्रिकेटपेक्षा देश महत्त्वाचा आहे असं अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला विश्वचषकातून बहिष्कृत करावं, त्यासाठी बीसीसीआयने आयसीसीवर दबाव आणावा अशीही मागणी करण्यात येत आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वाचं सगळं लक्ष बीसीसीआयच्या बैठकीकडे लागलं आहे.

वाचा: शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’ 

बीसीसीआयच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

सीओए अर्थात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो निर्णय क्रीडा मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाला कळवला जाईल. या निर्णयावर सल्लामसलत होईल, त्यानंतर बीसीसीआय आपला निर्णय जाहीर करेल.

नागपूरच्या रवींद्र थोडगेंची महत्त्वाची भूमिका

दरम्यान, क्रिकेट प्रशासक समितीमध्ये गुरुवारीच एका नव्या सदस्याचा समावेश झाला आहे.  सुप्रीम कोर्टाने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रवींद्र थोडगे यांची नियुक्ती केली आहे. रवींद्र थोडगे हे नागपूरचे आहेत. त्यांनी भारतीय सैन्यदलात मास्टर जनरल ऑर्डनंसपदावर काम केलं आहे. थोडगे यांची ही पहिलीच बैठक आहे. याच बैठकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या

 शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’  

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला नागपुरात विरोध, मैदान खोदण्याचा इशारा 

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा, खेळून हरवा: सुनील गावसकर  

पुलवामा हल्ल्यानंतर राजनाथ सिहांची EXCLUSIVE मुलाखत  

‘पुलवामाप्रमाणे आत्मघाती हल्ला करु’, जैशनंतर आता हिजबुलची धमकी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *