AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनरायझर्स हैदराबादची मालकीण करणार लग्न? ‘इतका’ श्रीमंत आहे काव्या मारनचा होणारा पती

सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काव्या मारन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

सनरायझर्स हैदराबादची मालकीण करणार लग्न? 'इतका' श्रीमंत आहे काव्या मारनचा होणारा पती
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 14, 2025 | 3:36 PM
Share

सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काव्या मारन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर हे दोघे गेल्या एक वर्षापासून डेट करत आहेत, आणि आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे, आणि आता ते लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहेत. काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबादची मालकीण आहे, तर अनिरुद्ध हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत. मात्र जरी काव्या मारन आणि अनिरुद्ध हे लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी देखील अद्याप दोघांकडूनही यासंदर्भंत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र रिपोर्टनुसार लवकरच हा विवाह होणार असून, या विवाहासाठी दोन्ही कुटुंबांकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे आता लवकरच या लग्नासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. काव्या मारन आणि अनिरुद्ध यांचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून देखील असा अंदाज व्यक्त केला जात आहे, की ते लवकरच लग्न करणार आहेत.

किती आहे दोघांची संपत्ती

काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे, तसेच ती सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण देखील आहे. काव्या मारनची एकूण संपत्ती अंदाजे 409 कोटींच्या आसपास आहे. तर काव्या मारनचे वडील कलानिधी मारन यांची संपत्ती 19 हजार कोटींच्या आसपास आहे. तर अनिरूद्ध यांची संपत्ती 50 कोटींच्या आसपास आहे. अनिरूद्ध हे सर्वात महागडे संगीत दिग्दर्शक आहेत, त्यांनी जवान चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फी घेतली होती.तर एआर रहमान एका चित्रपटासाठी 8 कोटी रुपये फी घेतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?