Team India ची डोकेदुखी ठरलेल्या Tim Southee ने पुन्हा चेतवलं, WTC फायनलअगोदर थेट कोहलीला इशारा

| Updated on: May 19, 2021 | 8:24 AM

साऊथीच्या एका फॅन्सने विराटची विकेट घेऊ इच्छितोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता 'तसं झालं मला आनंद होईल' असं सांगत विराटची विकेट घेण्यास तो किती आसुससा आहे, असंच साऊथीने सुचवलं. (Tim Southee Warning Indian Captain Virat kohli Before WTC Final 2021)

Team India ची डोकेदुखी ठरलेल्या Tim Southee ने पुन्हा चेतवलं, WTC फायनलअगोदर थेट कोहलीला इशारा
टीम साऊथी आणि विराट कोहली
Follow us on

मुंबईवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. पण फायनलअगोदरच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी माइंड गेम सुरु केला आहे. संपूर्ण टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेल्या न्यूझीलंडचा बोलर टीम साऊथीने (Tim Southee) थेट भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इशारा दिला आहे. (Tim Southee Warning Indian Captain Virat kohli Before WTC Final 2021)

टीम साऊथीचा विराटला इशारा

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. तत्पूर्वी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम साऊथीसह अन्य खेळाडूंबरोबर त्यांचे चाहते विमानतळावर फोटो घेत होते.

याचदरम्यान साऊथीच्या एका फॅन्सने विराटची विकेट घेऊ इच्छितोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘तसं झालं मला आनंद होईल’ असं सांगत विराटची विकेट घेण्यास तो किती आसुससा आहे, असंच साऊथीने सुचवलं. दुसरीकडे या माध्यमातून साऊथीने थेट विराटला डिवचल्याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये आहे.

न्यूझीलंडची त्रिमुर्ती, भारतीय बॅट्समनची ‘खरी कसोटी’

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रिषभ कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांचा सामना ट्रेंट बोल्ट, टिम साउथी आणि नील वॅगनर या आग ओकणाऱ्या बोलर्सशी होणार आहे ते ही इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्टीवर… न्यूझीलंडच्या या त्रिमुर्ती बोलर्ससमोर भारतीय बॅट्समनची खरी कसोटी यावेळी लागणार आहे.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल.

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झान नाग्वास्वाल्ला.

(Tim Southee Warning Indian Captain Virat kohli Before WTC Final 2021)

हे ही वाचा :

ना सचिन, ना रोहित, ना विराट; अर्जुन तेंडुलकरचा आवडता क्रिकेटर कोण? चकित करणारं उत्तर!

वेदानंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे आईचं निधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत ए बी डिव्हिलियर्सचा मोठा निर्णय