AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकू सिंग बनला सरकारी अधिकारी, ‘या’ पदावर करणार काम

भारताचा युवा स्टार खेळाडू रिंकू सिंगला उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मोठी भेट दिली आहे. रिंकूला सरकारी नोकरी देण्यात आली आहे.

रिंकू सिंग बनला सरकारी अधिकारी, 'या' पदावर करणार काम
Rinku Singh
| Updated on: Jun 25, 2025 | 10:36 PM
Share

भारताचा युवा स्टार खेळाडू रिंकू सिंग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत, त्यामुळे तो अल्पावधित लोकप्रिय झाला आहे. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये झाला होता, त्याचे कुटूंब अतिशय साधे होते. मात्र रिंकूने कठोर परिश्रमाच्या जोरावर क्रिकेटच्या जगात नाव कमावले आहे. त्यानंकत आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारने रिंकू सिंगला मोठी भेट दिली आहे. रिंकूला सरकारी नोकरी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रिंकू सिंगला मिळाली सरकारी नोकरी

योगी सरकाने रिंकू सिंगची बेसिक एज्युकेशन ऑफिसर पदावर नियुक्ती केली आहे. रिंकूची ही नियुक्ती थेट भरती नियमांनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करणारा रिंकु आता शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देणार आहे. रिंकूच्या नोकरीसंदर्भात शिक्षण संचालक (बेसिक) यांनी एक पत्र जारी केले आहे. याआधीही अनेक खेळाडूंना सरकारतर्फे नोकरी देण्यात आलेली आहे.

योगी सरकारने रिंकूच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानातील दखल घेत त्याला नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून रिंकूला शिक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि विद्यार्थ्यांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. रिंकू सिंगने क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे, आता त्याला शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळाली आहे.

रिंकूची कारकीर्द

रिंकू सिंगने उत्तर प्रदेशकडून खेळताना आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये प्रकाशझोतात आला. रिंकूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2023 मध्ये सुरू झाली. रिंकूने आतापर्यंत भारतासाठी 2 वनडे आणि 33 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 55 धावा आणि टी-20 मध्ये 546 धावा केल्या आहेत. तो सध्या आयपीएलमध्ये केकेआरचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने केकेआरसाठी 5 चेंडूत 5 षटकार मारण्याची कामगिरी केलेली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.