Urvashi Rautela ने पलटी मारली, म्हणाली ‘मी ऋषभ पंतला ‘सॉरी’ म्हणाले नाही, म्हणजे..’

आशिया चषकाचे सामने पाहत असताना उर्वशी रौतेलाने पाकिस्तानच्या काही खेळाडूंचे व्हिडीओ सुद्धा इन्स्ट्रा स्टोरीला शेअर केले होते. त्यावेळी देखील तिची चर्चा अधिक होती.

Urvashi Rautela ने पलटी मारली, म्हणाली मी ऋषभ पंतला सॉरी म्हणाले नाही, म्हणजे..
Urvashi Rautela
Image Credit source: instagram
| Updated on: Sep 14, 2022 | 1:18 PM

मागच्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चा सुरु आहे. ऋषभ पंतला उर्वशी रौतेलाला दिल्लीत भेट घ्यायची होती. पण त्यावेळी पंतने उर्वशीला नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर अधिक चघळलं गेलं. काही तासांपुर्वी उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये उर्वशीने पंतची माफी मागितल्याचं म्हटलं होतं.

urvashi rautela

पण आत्ता उर्वशी रौतेलाने पलटी मारली आहे, मी असं काही म्हटलं नाही असं तिने स्पष्ट केलं आहे. आशिया चषकातील काही सामने पाहायला गेलेल्या उर्वशीला नेटकऱ्यांनी त्यावेळी देखील पंतच्या नावाने ट्रोल केलं होतं.

आशिया चषकाचे सामने पाहत असताना उर्वशी रौतेलाने पाकिस्तानच्या काही खेळाडूंचे व्हिडीओ सुद्धा इन्स्टा स्टोरीला शेअर केले होते. त्यावेळी देखील तिची चर्चा अधिक होती.

आज उर्वशी रौतेलाने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये मी माझ्या चाहत्यांसाठी माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा सगळीकडे व्हायरल झाला आहे.

उर्वशी रौतेलाच्याबाबत माफी मागितल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या, त्यानंतर तीने त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.