AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: चर्चा फक्त वैभवची पण दोन तगडे खेळाडूही पदार्पण करणार; एक तर श्रेयसचा लाडका अन् दुसरा…

भारत आणि आयर्लंड यांच्यातील ची-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. आता या सामन्यात केवळ वैभवचे पदार्पण होण्याची शक्यता नाहीये तर त्यासोबतच आणखी दोन खेळाडूच्या पदार्पणाची शक्यता आहे.

IND vs IRE: चर्चा फक्त वैभवची पण दोन तगडे खेळाडूही पदार्पण करणार; एक तर श्रेयसचा लाडका अन् दुसरा...
ind vs ire
| Updated on: Jun 26, 2026 | 9:41 AM
Share

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारतीय क्रिकेट संघ एका नव्या टी-20 प्रवासाला सुरुवात करत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. याचे कारण आहे वैभव सूर्यवंशी! या मालिकेत खेळून तो इतिहास रचू शकतो, कारण सध्या भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. वैभव हा विक्रम मोडू शकतो.वैभवकडे सर्वांचे लक्ष असणार आहे मात्र, या मालिकेत तो एकटाच खेळाडू नाही; आणखी दोन खेळाडू टी-20 मध्ये पदार्पण करू शकतात. भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी-20 सामने खेळले जातील. पहिला सामना शुक्रवार, 26 जून रोजी आणि दुसरा 28 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. वैभव सूर्यवंशीचा भारत ‘अ’ संघासाठी शेवटचा सामना श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेचा अंतिम सामना होता, ज्यात त्याने 11 चेंडूंमध्ये विक्रमी अर्धशतक झळकावले होते. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि चाहते त्याचा हा फॉर्म आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

भारताकडे अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या रूपात तीन अव्वल दर्जाचे सलामीवीर आहेत, जे सर्वजण बऱ्याच काळापासून खेळत आहेत. श्रेयस अय्यरसमोर वैभव सूर्यवंशीची जागा कोणाला द्यायची हा पेचप्रसंग उभा राहील. वैभवची कामगिरी पाहता, त्याला बदलण्यावर कोणतीही टीका होणार नाही. वैभवने आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप, MVP आणि सर्वाधिक षटकारांचे पुरस्कार जिंकले आहेत.

वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव या मालिकेत टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण आधीच केले आहे. गोलंदाजी प्रशिक्षकाने प्रिन्सबद्दल सांगितले की, “तो संघात चांगलाच रुळला आहे आणि राष्ट्रीय संघासोबतचा हा त्याचा पहिलाच सराव आहे असे वाटले नाही.” प्रिन्स यादवने आयपीएल 2026 मध्ये लखनौसाठी पॉवरप्लेमध्ये फलंदाजांना अडचणीत आणत शानदार कामगिरी केली. त्याने 14 सामन्यांमध्ये 16 बळी घेतले.

श्रेयस अय्यरचा लाडका खेळाडू करणार पदार्पण

सूर्यांश शेडगे आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पण करू शकतो. दुखापतीमुळे बाहेर झालेल्या नितीश कुमार रेड्डीच्या जागी या 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या अलीकडील फॉर्ममुळे निवड समितीने त्याला बदली खेळाडू म्हणून निवडले आहे. त्याने श्रीलंकेतील त्रिकोणीय मालिकेत भारत ‘अ’ संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली होती. श्रेयस अय्यर आणि सूर्यांश शेडगे दोघेही मुंबईकडून खेळतात आणि आयपीएलमध्ये पण ते पंजाब किंग्जकडून खेळतात. श्रेयस सूर्यांशला खूप वर्षांपासून ओळखतो आणि त्याला त्याचा खेळ पण माहित आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...