Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट संघाचा कर्णधार बनवलं, अचानक असा निर्णय का घेतला?
Vaibhav Sooryavanshi Captain: भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानांवर अनेकदा नवीन विक्रम प्रस्थापित होतात. आज असंच काही घडले आहे. फक्त 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीकडे थेट संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबादारी पडली आहे.

Duleep Trophy: भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानांवर अनेकदा नवीन विक्रम प्रस्थापित होतात. आज असंच काही घडले आहे. फक्त 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीकडे थेट संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबादारी पडली आहे. वैभवकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. इशान किशन संघाचे कर्णधारपद सांभाळत होता पण अचानक ही जबाबदारी वैभवच्या खांद्यावर पडली. सामना सुरु असताना अचानक असं काय घडलं की इशान किशन सोडून वैभवला ही सर्वात मोठी जबाबदारी मिळाली.
सेंट्रल झोनविरुद्धच्या या हाय-व्होल्टेज सामन्याच्या १९ व्या षटकादरम्यान, ईस्ट झोनचा नियमित कर्णधार आणि अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू, इशान किशन, जखमी झाला आणि मैदान सोडून गेला. यानंतर संघाची संपूर्ण जबाबदारी वैभवच्या खांद्यावर पडली. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना एका निर्णायक वळणावर होता आणि पूर्व विभागाचा वेगवान गोलंदाज अभिजीत सरकारने मध्य विभागाला सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्रिपुराच्या या वेगवान गोलंदाजाने अमन मोखाडेला अवघ्या ८ धावांवर आणि कुणाल चंदेलाला ६ धावांवर बाद करून मध्य विभागाची अवस्था ३६ धावांवर २ गडी अशी केली होती.
१९ व्या षटकात चित्रच पालटले. यष्टीरक्षक इशान किशनच्या उजव्या मनगटावर अचानक चेंडू लागला. वेदनेने विव्हळत इशानने तात्काळ फिजिओथेरपिस्टची मदत घेतली. प्रथमोपचार करूनही वेदना कमी न झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. नंतर इशानच्या मनगटावर पट्टी बांधलेली दिसली. झारखंडच्या कुमार कुशाग्रने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, पण खरा प्रश्न हा होता की आता संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार? म्हणून, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी पुढे आला. तो संघाचे उपकर्णधार पद सांभाळत होता, आता संघाता मूळ कर्णधार जेव्हा मैदान सोडतो तेव्हा ही जबाबदारी संघाच्या उपकर्णधारावर पडते. यामुळेच वैभवकडे अवघ्या 15 वर्षी संघाचे कर्णधारपद भूषवायची जबाबदारी पडली. तो उपकर्णधार बनला होता तेव्हाच या निर्णयावर वाद झाला होता. आता कर्णधारपद सांभाळण्यावरही प्रश्न उपस्थित होतील की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
