Vaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची सचिनशी बरोबरी, पण चाहत्यांना आवडणार नाही तो रेकॉर्ड, नेमका कोणता?
वैभव सूर्यवंशी हा सातत्याने चर्चेत असतो. तो जेव्हापासून क्रिकेट खेळायला उतरलाय त्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभवची नेहमी सचिन तेंडुलकरशीही चाहत्यांकडून तुलना होत असते. दरम्यान आता पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा व्हायला लागली आहे कारणही तसंच आहे. नेमकं काय? जाणून घेऊ.

Vaibhav Sooryvanshi New Record : क्रिकेट जगतात जेव्हाही नर्व्हस 90चा विषय निघतो, तेव्हा क्रिकेटप्रेमींना मास्टर ब्लास्टरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. परंतू आता या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडत आहे. ते नाव म्हणजे टीम इंडियाचा नवोदित क्रिकेटपटू बेबी बॉस वैभव सूर्यवंशी. वैभवसोबतही असाच काहीसा प्रकार होत आहे. त्यामुळे आता नर्व्हस90 चा शिकार होण्याचा विचार केल्यास आता वैभव सचिनला मागे टाकणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सचिन त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये तब्बव २८ वेळा नर्व्हस९० चा शिकार झाला होता. ज्यामध्ये 18 वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि १० वेळा कसोटी सामन्यांमध्ये तो आऊट झाला. ज्यामुळे त्याच्या शतकी खेळी थोडक्यात हुकला.
दरम्यान, दुसरीकडे सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफीत वैभव हा इस्ट झोन संघाकडून खेळत आहे. तो इथे उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडतोय. त्याने या स्पर्धेत पहिल्यांदा 92 धावांची खेळी केलीय. परंतू हर्ष दुबे याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना त्याचे विकेट गमावून बसला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांतील वैभवच्या खेळीचा विचार केला तर तो सातव्यांदा 90 धावांच्या आसपास फसला आणि आऊट झाला.
वैभवच्या नर्व्हस ९०ची मालिका
4 नोव्हेंबर 2025 ला रणजी ट्रॉफीमध्ये (पटना) खेळताना वैभव 93 धावांवर आऊट झाला होता. त्यानंतर स्कॉटलंडविरुद्ध खेळताना (अंडर 19 वर्ल्डकप, जानेवारी 2026) वैभव 96 धावांवर आऊट झाला होता. तसेच आयपीएलमध्ये खेळताना लखनौसंघाविरुद्धच्या सामन्याच 93 धावांवर तो आऊट झाला होता. त्यानंतर 97 धावांवर गुजरातविरुद्ध तो आऊट झाला. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या (अ संघ) तिरंगी मालिकेत वैभव 94 धावांवर बाद झाला होता आणि आता दुलीप ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात 92 धावांवर तो बाद झाला आहे.
शतक हुकलं पण मोठा रेकॉर्ड केला नावावर
दरम्यान, वैभवकडून दुलीप ट्रॉफीमध्ये 92 धावांचं शतक हुकलं असलं तरी त्याने त्याच्या नावावर एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम केला आहे. 42 धावांच्या त्याच्या स्फोटक खेळीमध्ये 15 वर्ष 157 दिवसांच्या वयामध्ये अर्धशतक ठोकणारा वैभव हा दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. त्याने लक्ष्मण सिंग यांच्या नावावर असलेला 16 वर्ष 23 दिवसांचा जुना विक्रम मोडला आहे.
संघ अंतिम फेरीत पोहोचला
दरम्यान, यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये वैभवचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. ही स्पर्धा संपताच वैभव पुन्ही एकदा टीम इंडियासाठी खेळताना दिसेल. पुढील काही दिवसात टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेतील वैभवच्या खेळीकडेही चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
