Vaibhav Sooryavanshi: तिसऱ्या मॅचपूर्वी वैभवसोबत घडला भयानक प्रसंग, थेट चेंडू त्याच्या.. Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतीलतिसरा सामना आज रंगणार आहे. पण याआधी वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: तिसऱ्या मॅचपूर्वी वैभवसोबत घडला भयानक प्रसंग, थेट चेंडू त्याच्या.. Video Viral
vaibhav sooryavnashi
| Updated on: Jul 07, 2026 | 8:21 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचे आहे. भारतीय संघाने हा पण सामना गमावला तर मालिकाही गमावेल म्हणजे सलग दोन मालिका गमावण्याचा धोका भारतीय संघासमोर असेल. आता मागील सामन्यात वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले. या पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी विशेष काहीच करु शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष असणार आहे. पण आता तिसऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना वैभवसोबत अनर्थ घडला. ज्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याची तयारी करत असताना एक अपघात घडला. फलंदाजीच्या सरावादरम्यान त्याला चेंडू लागला, ज्यामुळे तो वेदनेने विव्हळू लागला. वैभव सूर्यवंशी ट्रेंट ब्रिज येथील नेट्समध्ये फलंदाजी करत होता, तर थ्रोडाउन स्पेशालिस्ट रघु त्याला गोलंदाजी करत होता. रघुने एक वेगवान बाउन्सर टाकला आणि वैभवचा पुल शॉट चुकला. परिणामी, चेंडू त्याच्या पोट आणि छातीच्या मधोमध लागला. वैभव वेदनेने विव्हळला आणि त्याला खाली बसावे लागले. त्यानंतर सराव थांबवण्यात आला आणि खेळाडूला पाणी देण्यात आले.

सुदैवाने, या 15 वर्षीय खेळाडूला गंभीर दुखापत झाली नाही. चेंडू त्याच्या छाती आणि पोटाला लागला, पण तो 5-6 मिनिटांनंतर फलंदाजीसाठी परतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्यवंशी दुखापतीपूर्वी जसा फलंदाजी करत होता, तसाच तो आताही करत असल्याचे दिसत होते. वैभव सूर्यवंशीने नेट्समध्ये शॉर्ट बॉल्सचा मोठ्या प्रमाणावर सराव केला होता, कारण इंग्लंडने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात याच चेंडूने त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. वैभव सूर्यवंशी फलंदाजी करत असताना अभिषेक शर्मा त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता. तो त्याला मार्गदर्शन करत नव्हता, पण असे वाटत होते की तो त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. वैभवने मारलेल्या प्रत्येक शॉट नंतर, तो त्या शॉटचा सराव करून तो शॉट खेळत होता.

तिसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीने मोठी खेळी करणे महत्त्वाचे आहे. कारण जर टीम इंडियाने हा सामना जिंकला नाही, तर आयर्लंडनंतर ते मालिका गमावतील. एक प्रकारे, उरलेले तीन सामने टीम इंडियासाठी ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती आहे. जर सूर्यवंशीच्या बॅटने या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर टीम इंडियाच्या विजयाची शक्यता वाढेल.

Follow Us