AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra, Mumbai Rains News LIVE: 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसात घट होण्याचा अंदाज

| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 8:50 AM
Share

Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates In Marathi: आज नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट असून सोमवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर-मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

Maharashtra, Mumbai Rains News LIVE: 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसात घट होण्याचा अंदाज
tv9 marathi blogImage Credit source: Tv9

अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. नालासोपार, वसई इथं रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात पाणी असल्याने लोकल १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर कल्याण-डोंबिवलीत आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले होते, शिवाय जनजीवनही विस्कळीत झालं होतं. दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून अनेक उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2026 05:54 PM (IST)

    लखनौ: अवैध स्थलांतर प्रकरणी दोषी ठरलेल्या 15 जणांना प्रत्येकी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

    बांगलादेशातून झालेल्या अवैध स्थलांतराशी संबंधित एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील पंधरा दोषींना प्रत्येकी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एनआयए विशेष न्यायालयाने आज या 15 बांगलादेशी आणि रोहिंग्या दोषींना शिक्षा सुनावली. त्यांना प्रत्येकी 28 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

  • 07 Jul 2026 05:42 PM (IST)

    लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांना एक दिवसाची कोठडी मंजूर

    राम मंदिराच्या देणग्या चोरल्याचा आरोप असलेले लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. उद्या सकाळी, अयोध्या पोलीस त्यांना रिमांडवर नेण्यासाठी जिल्हा कारागृहात जातील.

  • 07 Jul 2026 05:32 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील हुडको कॉलनीला पाण्याचा वेढा

    लोणवळ्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हुडको कॉलनीला पाण्याचा वेढा आहे. 250 घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कमरेइतकं पाणी या ठिकाणी जमलं आहे.

  • 07 Jul 2026 05:13 PM (IST)

    8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसात घट होण्याचा अंदाज

    राज्यातील बहुतांश भागात 8 जुलैपासून पावसात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील भागात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. किमान पुढील 10 दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

  • 07 Jul 2026 05:05 PM (IST)

    सीरिया: राजधानी दमास्कसमध्ये साखळी स्फोट

    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सीरियाच्या राजधानी दमास्कस दौऱ्यादरम्यान स्फोटांचे आवाज ऐकू आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका सुरक्षा सूत्राने सांगितले की, मॅक्रॉन ज्या हॉटेलमध्ये थांबणार होते, त्याच्या जवळ हे स्फोट झाले. स्फोटानंतर रस्ते बंद करण्यात आले आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.

  • 07 Jul 2026 04:54 PM (IST)

    पैठण : नाथांच्या पालखीवरून पुन्हा वाद; दुसरी पालखी रोखण्याची मागणी

    आषाढी वारीसाठी श्री संत एकनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचे आज सूर्यास्तासमयी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतानाच पालखीच्या अधिकाराचा जुना वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून श्री संत एकनाथ महाराज यांच्या नावाने पारंपरिक पालखी मार्गावरून दुसरी पालखी अथवा दिंडी काढण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, दुसरीकडे नाथ वंशजांनी आपली पायी दिंडी ही अनेक दशकांपासूनची परंपरा असून ती यंदाही नियोजनानुसार काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

  • 07 Jul 2026 04:40 PM (IST)

    पुणे -राजगड तालुक्यात पावसाने मोठं नुकसान

    पुण्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यात पावसाने मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. पावसाचं पाणी पोल्ट्री शेडमध्ये घुसल्याने कोंबड्या मेल्या आहेत. कृषी सभापती कडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.

  • 07 Jul 2026 04:24 PM (IST)

    पुणे : मावळला पावसाने झोडपलं, जनजीवन विस्कळीत

    पूर्ण जून महिना गेला मात्र पावसाचा टिपूसही मावळत पडत नव्हता. मात्र मान्सून मावळत दाखल झाला आणि आता सर्व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. मावळात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवनामाईने रुद्ररूप धारण केले आहे. तालुक्यातील भात शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले तर बहुतेक गावांचा संपर्क तुटला आहे.

  • 07 Jul 2026 04:11 PM (IST)

    सांगली – कृष्णा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली

    सांगलीच्या वाळवा तालुक्या मधल्या बहे इथल्या कृष्णा नदीवरचा बंधारा हा सध्या पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी 19 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत कृष्णा नदीवरचे एकूण तीन बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये वाळवा तालुक्यामधील बहे, सांगली येतील सांगलीवाडी, आणि मिरज तालुक्यामधल्या म्हैसाळ येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

  • 07 Jul 2026 03:55 PM (IST)

    ‘गोरस भंडारवरची अन्न व औषध प्रशासनाची कारवाई बेकायदेशीर’

    ‘गोरस भंडारवरची अन्न व औषध प्रशासनाची कारवाई बेकायदेशीर’. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे. स्वच्छता नाही म्हणून गोरसभंडारला टाळं लावलं होतं. 31 मे पासून गोरसभंडार बंद असल्याने 50 लाखांचं नुकसान. नुकसान भरपाई कोण देणार?, संस्थाचालकांचा सवाल

  • 07 Jul 2026 03:45 PM (IST)

    नाशिकवर आलेले ढगफुटीसदृश अतिवृष्टीचे संकट टळले

    नाशिकवर आलेले ढगफुटीसदृश अतिवृष्टीचे संकट टळले.. मुसळधार पावसाचा आणि वादळाचा धोकादायक भोवरा गुजरातच्या दिशेने मार्गस्थ.. वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचे संकट तूर्तास टळले..

  • 07 Jul 2026 03:30 PM (IST)

    वसई फाटा ते वसई स्टेशन रोड पाण्याखाली

    वसई फाटा ते वसई स्टेशन रोड पाण्याखाली. दुपारनंतर वसईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वसई फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरवात झाली आहे. वसई रेल्वे स्टेशन कडून येणाऱ्या वाहनांना पाण्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात वाहन पाण्यात अडकून पडली असून ट्राफिक सुद्धा जान झाले आहे.

  • 07 Jul 2026 03:13 PM (IST)

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही सहकाऱ्यांकडून मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप. घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

  • 07 Jul 2026 02:55 PM (IST)

    तळोजा परिसरात भीषण अपघात, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

    नवी मुंबईतील तळोजा परिसरात एक भीषण हिट-अँड-रनची घटना घडली आहे. तळोजा फेज १ मध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इलेक्ट्रिक कारने रस्त्यावर चार ते पाच वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

  • 07 Jul 2026 02:40 PM (IST)

    नाशिकच्या रामकुंड परिसरात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदान

    नाशिकच्या रामकुंड परिसरात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदान उतरला आहे. प्रशासनाला सहकार्य म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सेवा करण्यात येत आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात शेकडो स्वयंसेवक कार्यरत आहेत.

  • 07 Jul 2026 02:30 PM (IST)

    अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा रस्ता जलमय

    अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा रस्ता जलमय झाला आहे. अवघ्या पंधरा मिनिटाच्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच साचले आहे. रोटरी क्लब रस्त्या जवळ पाणीच पाणी झाले आहे. वाहतुकीच वेग मंदावला आहे.

  • 07 Jul 2026 02:15 PM (IST)

    उल्हास नदीच्या पुराचा फटका! मुख्य जलवाहिनी तुटल्याने पाणीपुरवठा 48 तास बंद

    उल्हास नदीच्या पुराचा फटका. मुख्य जलवाहिनी तुटल्याने कल्याण पूर्व-पश्चिमचा पाणीपुरवठा 48 तास बंद करण्यात आला आहे. या पाईपलाइन दुरुस्तीच काम सुरू आहे.

  • 07 Jul 2026 02:00 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळांची जहरी टीका

    अयोध्या श्रीराम मंदिर दान लुट प्रकरण हे संघाच्या आणि भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील विश्वस्त लोकांमुळ झाल असा आरोप आहे. ढगफुटीचे वल्गना करत महाराष्ट्राचा सुलतान देवेंद्र फडणवीस हा विषय भरकटून टाकण्याचा प्रयत्न करत आहे असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

  • 07 Jul 2026 01:50 PM (IST)

    झाड अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार महिला जखमी

    नवी मुबंईतील सानपाडा परिसरात झाड अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार महिला जखमी झाली. उद्यान विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर महिला किरकोळ जखमी झाली आहे.

  • 07 Jul 2026 01:40 PM (IST)

    कळवा परिसरात झाड कोसळले

    ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दर्शवला असून ठाणे शहरात पावसाचा वेग जरी मंदावला असला तरी देखील मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. तर ठाण्यातील कळवा परिसरात देखील स्टेशन मार्गावर एक भले मोठे झाड इमारतीच्या खिडकीवर जाऊन कोसळले आहे त्या घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानाच्या मदतीने झाड बाजूला करण्यात येत आहे.

  • 07 Jul 2026 01:30 PM (IST)

    खडकवासला धरणात 76 टक्के पाणीसाठा

    मुठा नदीमधील भिडे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्याने पाण्याचा मोठा फुगवटा होत आहे. पुणे महापालिकेचे जलपर्णी कडे दुर्लक्ष? मात्र खडकवासला धरणात वाढत असलेल्या पाण्यामुळे भिडे पुलावरील जलपरणी काढण्याचे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. खडकवासला धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणात 76 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण साखळी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज खडकवासलातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

  • 07 Jul 2026 01:20 PM (IST)

    मनोरी बीचवर तेलाने भरलेले एक जहाज अडकून

    मुंबईच्या मनोरी बीचवर गेल्या दोन दिवसांपासून तेलाने भरलेले एक जहाज अडकून पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोराई-मानोरी किनाऱ्याजवळ हे मालवाहू जहाज लाटांसह वाहत आले होते. जहाजाचे नाव “AL JAFZIA” असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आणि निगराणीत आहे. जहाजाच्या पुढील कारवाईबाबत तटरक्षक दल आणि येलो गेट पोलीस समन्वयाने काम करत आहेत. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने येलो गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  • 07 Jul 2026 01:10 PM (IST)

    नाशिकमध्ये काँग्रेसचं आंदोलन

    अयोध्या श्रीराम मंदिर कथित दान अपहार प्रकरणाच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. काळाराम मंदिराच्या बाहेर काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि राम मंदिर दान अपहार प्रकरणातील संबंधितांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे.

  • 07 Jul 2026 01:00 PM (IST)

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती प्रकरणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना धक्का बसला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला. सहकार विभागाने दिलेल्या स्थगिती आदेश कोल्हापूर खंडपीठाने उठवली.जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोकर भरती करण्याबाबतची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने परवानगी दिली.नोकर भरती स्थगिती विरोधात  बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली होती. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने स्थगिती दिली होती.

  • 07 Jul 2026 12:50 PM (IST)

    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. वारी आम्हाला जगण्याचा आनंद देते कानडा विठ्ठला असं म्हटलं जातं कर्नाटक मधून आम्ही वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही दाखल झालेला आहोत. वारीमध्ये विठ्ठल कायमच भेटतो अशी भावना वारकरी व्यक्त करत आहेत.

  • 07 Jul 2026 12:40 PM (IST)

    हवामान विभागाच्या अलर्टनुसार लासलगावसह परिसरात मुसळधार पाऊस

    हवामान विभागाच्या अलर्टनुसार लासलगावसह परिसरात मुसळधार पाऊस; 49 मिमी पावसाची नोंद. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. कोटमगाव रेल्वे पुलाजवळ पाणी साचल्याने वाहनधारकांची तारेवरची कसरत.

  • 07 Jul 2026 12:30 PM (IST)

    पुराच्या पाण्यातून अतिउत्साही नागरिकांची स्टंटबाजी

    पुराच्या पाण्यातून अतिउत्साही नागरिकांची स्टंटबाजी. पुलावरून गोदावरीच्या पुराचे पाणी वाहत असताना देखील पुराच्या पाण्यातून नदी ओलांडण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून स्टंटबाजी करणाऱ्यांना लाठीमार करण्यात आला.

  • 07 Jul 2026 12:30 PM (IST)

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्ता बंद

    त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुरू आहे संततदार पाऊस. नवीन रस्त्याचे काम सुरू असताना नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार केलेला पूल गेला वाहून.  मातीचा भराव टाकलेला पूल वाहून गेल्याने चाळीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला

  • 07 Jul 2026 12:20 PM (IST)

    KDMC आरोग्य केंद्राची भिंत कोसळून कार्यालय जमीनदोस्त

    कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे  रात्रीच्या सुमारास केडीएमसी आरोग्य केंद्राची भिंत लगतच्या एका कार्यालयावर कोसळल्याने ते कार्यालय पूर्णपणे जमीनदोस्त झाले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे.

  • 07 Jul 2026 12:10 PM (IST)

    रायगड जिल्ह्यातल्या नाणेघोळ डोंगराला तडे

    रायगड  जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ डोंगराला तडे गेले आहेत. त्यामुळे 60 ते 70 लोकांचे स्थलांतर केले गेले आहे. एका गावातील नागरिकांमध्ये सध्या भीती आहे. 2023 मध्ये अशाच नैसर्गिक कारणांमुळे गावातील 3 घरे कायमची उध्वस्त झाली. पण कुणीही लक्ष दिले नाही. अशी भावना इथल्या लोकांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता तरी शासनाने, प्रशासनानं या सर्व घडामोडींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केलीय. 

  • 07 Jul 2026 11:59 AM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे दरड कोसळली, डोडा-किश्तवाड महामार्ग बंद

    जम्मू-काश्मीरमध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे डोडा-किश्तवाड महामार्ग बंद झाला आहे. या घटनेचा फटका स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना बसला आहे.

  • 07 Jul 2026 11:50 AM (IST)

    इगतपुरीतील अनेकांच्या घरात पाणी शिरलं, नागरिकांचे हाल

    नाशिकच्या इगतपुरीत जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरीच्या वसंत पवार नगरमध्ये अनेकांच्या घरात पणी शिरलं आहे. घरात पाणी शिरल्यानंतर नागरिकांचे हाल झाले आहेत. नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे. इगतपुरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

  • 07 Jul 2026 11:40 AM (IST)

    नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ, मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला

    नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खालपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी पोहोचलंय आहे.

  • 07 Jul 2026 11:18 AM (IST)

    नागपुरातील दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाबाबत आज महत्वाची बैठक

    दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाबाबत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास आराखडा लवकरच सर्वसहमतीने साकारला जाणार असल्याची माहिती मिळतेय. तसेच वाढते पर्यटन लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

  • 07 Jul 2026 11:04 AM (IST)

    पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

    पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. पुढील 3 तासांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • 07 Jul 2026 10:45 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात पावसाचे तांडव सुरू

    अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात पावसाचे तांडव सुरू आहे. 24 तासात तब्बल 300 मिली पेक्षा जास्त पाऊस पडला. घाटघर परिसरात तब्बल 321 मिली पावसाची नोंद झाली आहे.  घाटघर, रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून आदिवासी बांधवांचे जनजीवन प्रभावित झालं आहे. आदिवासी दुर्गम भागात जोरदार पाऊस असून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

  • 07 Jul 2026 10:41 AM (IST)

    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये, इंद्रायणी काठी न जाण्याचं पोलिसांचं आवाहन…

    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये, वारकऱ्यांमध्ये भक्तीमय वातावरण आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठली आहे.  पोलीस प्रशासनाकडून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या काठी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  पोलीस प्रशासनाकडून इंद्रायणी काठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 07 Jul 2026 10:31 AM (IST)

    इगतपुरीतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पर्यटनस्थळांच्या मार्गांवर पोलिसांची कडक नाकाबंदी

    इगतपुरीतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पिंपरी पाटा परिसरापासून सर्व प्रमुख पर्यटनस्थळांच्या मार्गांवर पोलिसांची कडक नाकाबंदी आहे. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही पर्यटकाला पर्यटनस्थळी प्रवेश मिळणार नाही. ढगफुटीसदृश परिस्थिती व दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. येत्या 48 तासांसाठी धबधबे, धरणे, किल्ले आणि इतर पर्यटनस्थळे बंद राहणार असून  सर्व ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 07 Jul 2026 10:22 AM (IST)

    नाशिक – नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

    नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. इगतपुरीत सर्वाधिक 200 मिमी पावसाची नोंद झाली असून त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पाऊस पडला आहे.  तर सुरगाणा येथे 149 मिमी पावसाची नोंद झालीये.  सिन्नरमध्ये 74 मिमी, पेठमध्ये 61 मिमी पाऊस, दिंडोरीमध्ये 58 मिमी, पिंपळगावमध्ये 51 मिमी पाऊस आणि देवळा येथे 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  सततच्या पावसामुळे जिल्हाभरातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून अधिकारी अलर्ट आहेत.

  • 07 Jul 2026 10:09 AM (IST)

    सांगली- चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम, 118 मिलिमीटर पावसाची नोंद.

    सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे.गेल्या 24 तासात तब्बल 118 किलोमीटर इतक्या पावसाची नोंद चांदोली धरण क्षेत्रात झाली आहे. पाथरपुंज येथे तब्बल 190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता 16.22 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

  • 07 Jul 2026 10:04 AM (IST)

    इंद्रायणी नदीला महापूर, आळंदीला जोडणारे चारही पूल पाण्याखाली

    आळंदीमध्ये पावसाचं थैमान सुरू असून आळंदीला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इंद्रायणी नदीला महापूर आला आहे.

  • 07 Jul 2026 09:55 AM (IST)

    कल्याण पूर्वेत पालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली

    कल्याण पूर्वेतील ड प्रभागात दुर्गेश इमारतीलगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत रात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. भिंत इमारतीच्या कार्यालयाच्या दिशेने कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे वार्ड अधिकारी व संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीचा आढावा घेण्यात आला. जागा कच्ची असल्याने येथे भिंत बांधू नये, अशी सूचना सोसायटीने यापूर्वीच दिली होती, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला होत

  • 07 Jul 2026 09:50 AM (IST)

    शहापूर तालुक्यात रात्रभर अति मुसळधार पाऊस

    मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड माती कोसळायला सुरुवात झाली असून हिवाळा ब्रिज पॉईंट जवळ जुन्या कसारा घाटात दरड माती महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. थोड्या फार प्रमाणात माती व दगडी बाजुला केल्याने एका बाजूने वाहतूक संत गतीने सुरू केली आहे . शहापूर तालुक्यात रात्रभर अति मुसळधार पाऊस पडत असल्याने कसारा घाटात महामार्गालगत असलेला माती चा भराव कोसळून महामार्गावरील रस्त्यावर आले होते.

  • 07 Jul 2026 09:40 AM (IST)

    नालासोपाऱ्यात पाणी अजूनही साचून

    नालासोपाऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पाऊस उघडला आहे. पण रस्त्यावर पाणी कायम आहे. गुडघ्याभर पाण्यातून लोकांना रस्ता काढवा लागत आहे. काल नालासोपऱ्यात पावसाने थैमान घातले होते.

  • 07 Jul 2026 09:30 AM (IST)

    सई विरार परिसरात आज सकाळ पासून पावसाने विश्रांती

    नालासोपार पूर्व रेल्वे स्थानक बाहेरिल रस्त्यावर आजही गुडगा ते कंबरे इतके पाणी साचलेले आहे. याच पाण्यातून प्रवाशाना मार्ग काडत स्टेशन गाठावे लागत आहे. दुकान अर्ध्याच्या वर बुडालेले आहेत.

  • 07 Jul 2026 09:20 AM (IST)

    दमदार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात अत्यंत वेगाने वाढ…

    बारवी धरण 30 टक्क्यांवर पोहचले…अवघ्या काही दिवसातच धरणातील पाणी साठ्याने 30% चा टप्पा ओलांडला…जून महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा 21.74 टक्क्यापर्यंत खाली आला होता ,मात्र सोमवारी 6 जुलै रोजी सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 30.6% वर पोहोचला आहे.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण पातळी अजूनही खूपच मागे आहे.. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात तब्बल 63.53% पाणीसाठा उपलब्ध होता..

  • 07 Jul 2026 09:06 AM (IST)

    नाशिक मुंबई व मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यांची दोन दिवसात झाली चाळण

    दोन दिवस पडलेल्या पावसाने रस्त्याच्या कामाची पोलखोल. गोंदे ते घाटणदेवी मंदिरापर्यंत महामार्गावर खड्डेच खड्डे  वाहन चालवताना वाहनधारकांची कसरत. तर बोरटेंभा फाटा येथे गेल्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम रखडले असून परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य. बोरटेंभा फाटा येथे पाचशे मीटर परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

  • 07 Jul 2026 09:00 AM (IST)

    गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षारक्षकांसह पोलीस तैनात

    नाशिक – गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षारक्षकांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नदीपात्र परिसरात पाण्यात उतरण्यास पोलिसांची मनाई आहे. गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. रामकुंड, गांधी तलाव, लक्ष्मण कुंड परिसरात पाणी वाढलं आहे.

  • 07 Jul 2026 08:50 AM (IST)

    खडकवासला धरण आज ६२% टक्के क्षमतेनं भरलं असून कोणत्याही क्षणी विसर्ग करण्याची शक्यता

    खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. खडकवासला धरण आज ६२% टक्के क्षमतेनं भरलं आहे. धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण पाहता खडकवासलातून काही तासांत विसर्ग करण्याची शक्यता आहे. पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेण्याचं आवाहन धरण प्रशासनाने केलं आहे.

  • 07 Jul 2026 08:40 AM (IST)

    गोरेगावातील MTNL फ्लायओव्हर ब्रिजवर पलटला अंड्यांनी भरलेला ट्रक

    मुंबईच्या गोरेगावातील MTNL फ्लायओव्हर ब्रिजवर आज पहाटे सुमारे 3 वाजता अंड्यांनी भरलेला एक ट्रक पलटला होता. सध्या क्रेनच्या मदतीने पलटलेला ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, पण लाखो रुपयांची अंडी नष्ट झाली. रस्त्यावर पसरलेली लाखो रुपयांची अंडी आता हटवण्यात आली आहेत. माहितीनुसार अंड्यांनी भरलेला ट्रक जेव्हा ब्रिजवर पोहोचला, तेव्हा बाजूने एक वेगाने जाणारी गाडी गेली. त्यामुळेच ट्रकचं संतुलन बिघडलं आणि तो पलटला.

  • 07 Jul 2026 08:33 AM (IST)

    पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील शाळांना सुट्टी

    पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीची तीव्रता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुट्टीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 7 जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.

  • 07 Jul 2026 08:28 AM (IST)

    नगर – नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी

    नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने नगर – नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी करण्यात आली आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने निर्णय घेतला आहे. सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर बंद पर्यटकांसाठी बंद आहे. रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही.

  • 07 Jul 2026 08:24 AM (IST)

    खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद

    मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पाऊस आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी हवामान विभागाने ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला आहे. 300 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातील सुमारे 100 नागरिकांचं रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. तर मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे.

  • 07 Jul 2026 08:20 AM (IST)

    इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे, किल्ले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

    इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे, किल्ले आदी 48 तास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासन, वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा याठिकाणी बंदोबस्त राहणार आहे. पर्यटकांना या स्थळांवर मज्जाव करण्यात आला आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे.

  • 07 Jul 2026 08:18 AM (IST)

    पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आज सकाळपासून सुरू

    अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. काही प्रमाणात नालासोपार-वसई रेल्वे ट्रॅकवर पाणी असल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत.

  • 07 Jul 2026 08:18 AM (IST)

    अखेर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडीचा मलबा हटवण्यात प्रशासनाला यश

    अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडीचा मलबा हटवण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे. रात्री १०.१० वाजता एमएसआरडीसी आणि संबंधित बांधकाम कंपनीने मलबा हटवून रस्ता सुरक्षित घोषित केला. त्यानंतर पाहणी पूर्ण झाल्यावर दोन मार्गिकांवरून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. उर्वरित दोन मार्गिकांवर अद्याप पाणी वाहत असल्याने त्या बाजूची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे, लेन शिस्त पाळावी आणि महामार्ग पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 07 Jul 2026 08:17 AM (IST)

    मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम

    मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून अनेक उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. चेन्नईहून पुण्याकडे येणारे इंडिगोचं 6E-502 हे विमान वळविल्यानंतर सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरलं. कोलकाताहून पुण्याकडे येणारे इंडिगोचे 6E-135 हे विमान तात्पुरतं हैदराबादकडे वळविण्यात आलं आणि त्यानंतर पुण्याकडे रवाना करण्यात आलं. अकासा एअरचे एक उड्डाण परिचालन कारणास्तव रद्द करण्यात आलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतर विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत असून विमानतळावरील प्रवासी सुविधांवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  • 07 Jul 2026 08:15 AM (IST)

    शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर

    हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महामुंबईत काही भागांत गेल्या चोवीस तासांत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे.

  • 07 Jul 2026 08:12 AM (IST)

    नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली

    नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरी नदीपात्र कोरडं होतं. नाशिकसह त्रंबकेश्वरमध्ये आज ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात मुसळधार पाऊस आहे.

Published On - Jul 07,2026 8:10 AM

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत