Vijay Hazare Trophy | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची 92 धावांची सुस्साट खेळी, हिमाचल प्रदेशवर शानदार विजय

हिमाचल प्रदेशला (himanchal pradesh) पराभूत करत मुंबईने विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy) सलग 5 वा विजय मिळवला आहे.

Vijay Hazare Trophy | 'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूरची 92 धावांची सुस्साट खेळी, हिमाचल प्रदेशवर शानदार विजय
हिमाचल प्रदेशला (himanchal pradesh) पराभूत करत मुंबईने विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy) सलग 5 वा विजय मिळवला आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 5:54 PM

जयपुर : विजय हजारे स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy) एलीट गटातील डी ग्रृपमधील मुंबई (Mumabai) विरुद्ध हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) यांच्यात आज सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने हिमाचल प्रदेशवर 200 धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबईने हिमाचलला 322 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईच्या बोलर्सनी हिमाचलला 24.1 ओव्हरमध्ये 121 धावांवर ऑल आऊट केलं. यामुळे मुंबईचा 200 धावांनी मोठा विजय झाला. हिमाचलकडून मयंक डागरने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 सिक्ससह सर्वाधिक 38 धावा केल्या. तर मुंबईकडून प्रशांत सोलंकीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच शम्स मुलानीने 3 फलंदाजांना बाद केलं. (vijay hazare trophy 2020 21 shardul thakur scored 92 runs mumbai beat himanchal pradesh by 200 hundred runs)

हिमाचलची बॅटिंग

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हिमाचल प्रदेशला मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. एकाही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांनी मैदानात टिकून दिले नाही. मुंबईने हिमाचलचा डाव 24.1 ओव्हरमध्ये 121 धावांवर आटोपला. यामुळे मुंबईचा 200 धावांनी विजय झाला. हिमाचलकडून मयंक डागरने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 सिक्ससह सर्वाधिक 38 धावा केल्या. मुंबईकडून प्रशांत सोलंकीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शम्स मुलानीने 3 फलंदाजांना बाद केलं. तर धवल कुलकर्णीने 2 विकेट्स मिळवल्या.

शार्दुल ठाकूरचा झंझावात

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजांनी हिमाचलच्या बोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईकडूने शार्दुल ठाकूरने 57 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने धमाकेदार 92 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने 75 बोलमध्ये 15 फोरसह 91 धावांची खेळी केली. तर आदित्य तरेनेही 98 चेंडूंद्वारे 6 फोर आणि 1 सिक्सद्वारे 83 रन्स काढल्या.या तिघांच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित 50 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 321 धावा केल्या.

मुंबईचा विजयी पंच

मुंबईने हिमाचलला पराभूत करत सलग पाचवा विजय साजरा केला. यासह मुंबई डी ग्रृपमध्ये 20 पॉइंट्ंस अव्वल क्रमांकावर आहे. मुंबई या स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करत आहे. प्रत्येक खेळाडू हा आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत आहे. बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तिनही आघाड्यांवर मुंबईचे खेळाडू यशस्वी ठरत आहेत.

शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

शार्दुल या स्पर्धेत बोलिंगसह बॅटिंगनेही ऑलराऊंड खेळी करतोय. राजस्थान विरुद्ध 8 ओव्हरमध्ये 50 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय

(vijay hazare trophy 2020 21 shardul thakur scored 92 runs mumbai beat himanchal pradesh by 200 hundred runs)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.