Vijay hazare Trophy 2021 मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार तर अर्जुन तेंडुलकरला स्थान नाही!

विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा केली गेली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. | Vijay hazare trophy

Vijay hazare Trophy 2021 मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार तर अर्जुन तेंडुलकरला स्थान नाही!
अर्जून तेंडुलकर आणि श्रेयस अय्यर

मुंबई विजय हजारे करंडकासाठी (Vijay Hazare trophy 2021) मुंबई संघाची (Mumbai team) घोषणा झाली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) सुपुत्र अर्जून तेंडुलकरचा (Arjun tendulkar) मुंबईच्या संघात समावेश होऊ शकलेला नाही. येत्या 20 फेब्रुवारीपासून विजय हजारे करंडकाला सुरुवात होत आहे. (Vijay Hazare trophy 2021 no Place For Arjun tendulkar, Shreyas Iyer Mumbai Captain)

सय्यद मुश्ताक अली (Sayyed Mushtaq Ali Trophy) ट्रॉफीमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करण्यास सो सज्ज झाला आहे. श्रेयसबरोबर तडाखेबाज फलंदाज पृथ्वी शॉ याला मुंबईचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

मुंबईच्या संघात बॅट्समन कोण?

मुंबई संघात तगड्या फलंदाजांचा भरणा आहे. शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी, सरफराज खान, अखिल हरवादकर आणि विकेटकीपर फलंदाज आदित्य तारे अशा स्टार फलंदाजांचा संघात भरणा आहे.

मुंबईची बोलिंगची भिस्त कुणाच्या खांद्यावर?

संघात जसा स्टार फलंदाजांचा भरणा आहे तसा विकेट टेकर गोलंदाजांचाही समावेश आहे. प्रतिस्पर्धी संघाची दांडी गुल करण्यासाठी धवल कुलकर्णी सज्ज झाला आहे. त्याच्या जोडीला तुषार देशपांडे, आकाश पारकर, तर फिरकीपटू शम्स मुलानी आणि अर्थव अंकोलेकर यांचाही संघात समावेश झाला आहे.

रमेश पोवार मुंबईचे मुख्य प्रशिक्षक

मुंबईने मंगळवारी भारताचे माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार यांची टूर्नामेंटच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबईला एलीट ग्रुपमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पाँडेचरी या संघांसोबत ठेवलं आहे.

दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीला येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. ही टूर्नामेंट कोलकाता, सूरत, तमिळनाडू, जयपुर, बँगलोर आणि इंदौर या सहा ठिकाणी खेळवण्यात येईल.

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईची टीम : श्रेयस अय्यर (कप्तान), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, अखिल हेरवाडकर, सरफराज खान, चिन्मय शंकर, आदित्य तारे, हार्दिक तामोर, शिवम दूबे, आकाश पारकर, आतिफ अटवाल, आतिफ अटवाल अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राउत आणि मोहित अवस्थी

(Vijay Hazare trophy 2021 no Place For Arjun tendulkar, Shreyas Iyer Mumbai Captain)

हे ही  वाचा :

Virat Kohli | ‘रनमशीन’ कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं

India vs England : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे ‘हे’ 5 शिलेदार ठरले खलनायक!

Published On - 8:20 am, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI