Vinod Kambli : एकनाथ शिंदेंचा दिलदारपणा, एका झटक्यात हलाखीत दिवस काढणाऱ्या विनोद कांबळीच्या भविष्याची चिंता मिटवून टाकली

टीम इंडियासाठी एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळी यांनी आज सहकुटुंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्या माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे.

Vinod Kambli : एकनाथ शिंदेंचा दिलदारपणा, एका झटक्यात हलाखीत दिवस काढणाऱ्या विनोद कांबळीच्या भविष्याची चिंता मिटवून टाकली
Vinod Kambli Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 7:01 PM

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळी कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे. मोठी जबाबदारी यावेळी शिंदे यांनी स्वीकारली आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कांबळी यांच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. कांबळी कुटुंबाला मदतीचा हात देण्याची ग्वाही शिंदे यांनी या भेटीदरम्यान दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिलदारपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ते अनेकदा अनेकांना मदत करताना दिसून येतात. शिंदे केवळ आर्थिकच नाही तर वेळप्रसंगी ते चालता ताफा थांबवून गरजूंच्या मदतीला धावल्याचं यापूर्वीही पाहायला मिळालेलं आहे.

दरम्यान, कांबळी हे सध्या हलाखीच्या परिस्थितीत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अलिकडे त्यांचा एका आश्रमातील व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्यांच्याबद्दल चाहत्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्या सर्व पार्श्वभूमिवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कांबळींना मोठी मदत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Loading...

सध्या कुठे राहतात विनोद कांबळी?

दरम्यान, सध्या विनोद कांबळी ठाणेतील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील निदान सेंटर फॉर एल्डरली केअरमध्ये राहत आहेत. तिथे ते उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये त्यांना विविध सुविधा मिळतात. स्वच्छता आणि तिथे मिळणाऱ्या सर्वांच्या प्रेमाबद्दल व्हायरल व्हिडिओमधून विनोद कांबळीनेही समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले होते.

विनोद कांबळींच्या प्रकृतीबाबत चाहते अनेकदा चिंता व्यक्त करतात. कांबळींची तब्येत मध्यंतरी प्रचंड खालावलेली. ते नीट चालूही शकत नव्हते. आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यापूर्वीही अनेकांनी त्यांना मदत केली आहे, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. अलिकडे त्यांना वृद्धाश्रमात भरती केल्यानंतर मात्र चाहत्यांना प्रचंड वेदना होत होत्या. एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर मैदान गाजवलेल्या या लढवय्या खेळाडूसाठी एकनाथ शिंदेंनी केलेली मदत मोलाची ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us