8 व्या नंबरवर येऊन 6 चेंडूत 6 सिक्सर, शेतकऱ्याच्या पोराची कमाल!

पालघर: पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत भारतीय संघातील क्रिकेटर युवराज सिंहचा रेकॉर्ड सर्वांना माहित आहे. मात्र त्यानंतर आता विरारच्या मकरंद पाटीलनेही सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. 89 व्या टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत मकरंदने आपली कामगिरी दाखवली. मकरंद विरारच्या विवा सुपरमार्केट संघातर्फे […]

8 व्या नंबरवर येऊन 6 चेंडूत 6 सिक्सर, शेतकऱ्याच्या पोराची कमाल!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पालघर: पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत भारतीय संघातील क्रिकेटर युवराज सिंहचा रेकॉर्ड सर्वांना माहित आहे. मात्र त्यानंतर आता विरारच्या मकरंद पाटीलनेही सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. 89 व्या टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत मकरंदने आपली कामगिरी दाखवली. मकरंद विरारच्या विवा सुपरमार्केट संघातर्फे मैदानात उतरला होता.

विरारच्या विवा सुपरमार्केट संघाने महिंद्रा लॉजिस्टिक्स ली संघावर 78 धावांनी मात करत जेतेपद मिळविले. मकरंद पाटीलने सचिन मयेकरच्या एकाच षटकात मारलेले सहा षटकार हे विवा सुपरमार्केट संघाचे वैशिष्ट्य ठरले. या विजेतेपदाचा मानकरी संघातील एका शेतकऱ्याचा मुलगा मकरंद पाटील हा ठरला आहे. मकरंदने 8 व्या स्थानावर फलंदाजीला येऊन 12 षटकारचा पाऊस पाडत 26 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली.

टीम इंडियातील पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, विनायक भोईर, रास्टन डायस या क्रिकेटपटूंनंतर पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने चमकदार खेळी दाखवली. ग्रामीण भागातील तरुणांना जर चांगली संधी मिळाली तर निश्चितच ते आपले नाव उंचावतील असा आशावाद मकरंदच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला.

कोण आहे मकरंद पाटील?

मकरंद पाटील हा 23 वर्षांचा मुलगा विरारच्या अर्नाळा येथील शेतकरी कुटुंबातील आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड आहे. महाविद्यालयात असताना तो  साईनाथ क्लबकडून कांगा क्रिकेट खेळत होता. वडील शेतकरी असल्याने मकरंदला नोकरीचीही गरज होती. अशावेळी विवा सुपरमार्केट कंपनीचे संचालक शिखर ठाकूर यांनी त्याला हेरले आणि आपल्या टीममध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली. मागच्या एक वर्षांपासून तो विवा सुपरमार्केट संघात खेळत आहे. शिखर ठाकूर यांनी मकरंदला त्यांच्या कंपनीत सेल्समनचे कामही दिलं. सकाळी आपल्या शेतात काम करतो आणि 10 ते 4 पर्यंत मकरंद सेल्समनचं काम करुन 4 च्यानंतर 6.30 वाजेपर्यंत दररोज विरारच्या जीवदानी मैदानावर क्रिकेटचा सराव करतो. त्याच्या खेळाचा सर्व खर्चही पूर्ण संघ करतो. त्यामुळे त्याला आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.