AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | विराटसाठी 2020 वर्ष अनलकी, तब्बल 11 वर्षानंतर शतक नाही

रनमशीन असलेल्या विराट कोहलीसाठी 2020 हे वर्ष अनलकी ठरलं.

Virat Kohli | विराटसाठी 2020 वर्ष अनलकी, तब्बल 11 वर्षानंतर  शतक नाही
| Updated on: Dec 19, 2020 | 12:51 PM
Share

अ‌ॅडिलेड : कोरोनामुळे 2020 हे वर्ष (Covid 19) सर्वांसाठी वाईट आठवणींसाठी लक्षात राहील. मात्र हे वर्ष टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) वेगळ्या कारणामुळे लक्षात राहिल. विराट कोहलीला टीम इंडियाचा रन मशीन म्हणून ओळखलं जातं. विराट दरवर्षी शतक ठोकतो. मात्र विराट यावर्षी अर्थात 2020 मध्ये शतक (तिनही फॉर्मेट) लगावण्यात अपयशी ठरला आहे. शतकांबाबत विराटची यावर्षी पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे विराटवर तब्बल 9 वर्षानंतर शतक न लगावण्याची नामुष्की ओढावली आहे. Virat Kohli failed to score a century in 2020

विराटने 2008 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पदार्पणातील वर्षात विराटला शतकी कामगिरी करता आली नाही. मात्र त्यानंतर विराटने शतकांचा धडाकाच लावला. विराटने 2009 पासून शतक ठोकण्याची मालिका सुरु केली. मात्र 2020 मध्ये या मालिकेला पूर्णविराम मिळाला.

विराटला ही नामुष्की टाळण्याची संधी होती. विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत 74 धावा केल्या. विराटला शतकाची संधी होती. मात्र अजिंक्य रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराट दुर्देवीरित्या रन आऊट झाला.

पहिल्या कसोटीनंतर मायदेशी

विराटला या 2020 मध्ये शतक लगावण्याची संधी होती. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात आणखी 3 कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. अनुष्का-विराट लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे.

2017 आणि 18 मध्ये कारकिर्दीतील सर्वाधिक शतकं

विराटने 2017 आणि18 मध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक शतकं लगावली. विराटने 2017 आणि18 मध्ये प्रत्येकी 11 वेळा शतकं झळकावलं.

विराटची वर्षनिहाय शतकी संख्या

2008-0 2009-1 2010-3 2011-4 2012-8 2013-6 2014-8 2015-4 2016-7 2017-11 2018-11 2019-7 2020-0

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | ‘उडता’ विराट, कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहिलात का?

Virat Kohli failed to score a century in 2020

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.