Virat Kohli Video : शेवटच्या क्षणी विराटने असं काही केलं की…संपूर्ण देश अभिमानाने ठोकतोय सलाम, व्हिडीओ व्हायरल!
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात अशी कृती केली आहे, ज्याची देशभरात चर्चा होत आहे. त्याच्या या कृतीनंतर सर्वांचाच उर अभिमानाने भरून गेला आहे. लोक रोहितचे कौतुक करत आहेत.

Virat Kohli Viral Video : ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात भारताचे स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दमदार कामगिरी करून दाखवली. 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले. या सामन्यात रोहितने नाबाद 121 धावांची खेळी केली. तर विराटनेही 74 धावा केल्या. दरम्यान, या सामन्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे असतानाच आता विराट कोहलीचा एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला पाहून देशभरातील क्रिकेटचे चाहते विराटला अभिमानाने सलाम ठोकत आहेत.
विराट, रोहित कधीही होऊ शकतात निवृत्त
विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. हे दोघे कधीही निवृत्त होऊ शकतात असे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील या सामन्याला विराट, रोहितच्या चाहत्यांनी आवर्जून हजेरी लावली आहे. यावेळी विराट आणि रोहितची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक होता. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही ड्रेसिंग रुममध्ये जात होते. दुसरीकेड ते जात असताना प्रेक्षक त्यांचे अभिनंदन करत होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होते. असे असतानाच एका चाहत्याच्या हातातून भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा खाली पडला.
विराटने नेमकं काय केलं?
ही बाब विराट कोहलीच्या लक्षात येताच तो खाली वाकला आणि त्याने त्याने लगेच तिरंगा उचलून क्रिकेट पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या हातात दिला. विशेष म्हणजे ही कृती करताना विराटने कुठलाही गवगवा केला नाही. त्याने गुपचूप तिरंगा उचलून तो प्रेक्षकाच्या हातात दिला आणि पुढे चालू लागला. विराटच्या याच कृतीची सगळीकडे चर्चा होत आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.
विराट कोहली ने गिरते हुए तिरंगे झंडे को संभाल कर उठाया🔥
देश का तिरंगा झंडा विराट के दिल में बसता है ❤️pic.twitter.com/yDAOfcoqUS
— Vandana Meena (@vannumeena0) October 25, 2025
विराट, रोहितने जिंकून दिला सामना
दरम्यान 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने 125 चेंडूंमध्ये 121 धावा केल्या. तर विराट कोहलीने 81 चेंडूंमध्ये नाबाद 74 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दिलेले 237 धावांचे लक्ष्य भारताला सहज गाठले.
