AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप खेळणे नाही तर ‘हे’ आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही सर्वोत्कृष्ट फलंदाज? उत्तर वाचून वाटेल अभिमान

Virat Kohli : आपण स्वतःला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज का मानत नाही, याचा उलगडा करताना विराटने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच, 2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची सल आजही मनात असल्याची खंत विराटने यावेळी बोलून दाखवली.

वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही सर्वोत्कृष्ट फलंदाज? उत्तर वाचून वाटेल अभिमान
Virat kohli interviewImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 4:50 PM
Share

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत टीम इंडियाचे स्टार रोको म्हणजे विराट आणि रोहित शर्मा यांच्या खेळीकडे लक्ष लागले आहे. पण आता विराट कोहलीने मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. “केवळ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणे हे आपले ध्येय नसून, त्यापलीकडे जाऊन भारताला चॅम्पियन बनवणे हे आपले स्वप्न’ असल्याचे माजी कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. वनडे विश्वचषकापूर्वी एका मुलाखतीत त्याने या स्वप्नावर भाष्य केले आहे. तसेच, क्रिकेट जगतात त्याला सर्वोत्तम फलंदाज मानले जात असले तरी, तो स्वतःला तसे मानत नाही, याचाही मोठा उलगडा विराटने केला आहे.

काय आहे कोहलीचे स्वप्न’?

विराट म्हणाला, “मी नेहमीच असा खेळाडू राहिलो आहे, ज्याला आपल्या संघासाठी जास्तीत जास्त सामने जिंकायचे असतात. अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना मॅच विनिंग खेळी करून भारताला विश्वचषक जिंकून द्यावा, हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. माझ्यासाठी विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणे सर्वात महत्त्वाचे आहे.”

स्वतःला सर्वोत्कृष्ट का मानत नाही?

जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याच्या प्रश्नावर विराटने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले. “मी स्वतःला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मानत नाही. वेगवेगळ्या दशकांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत आणि काहींची आकडेवारी माझ्यापेक्षाही भारी आहे. प्रत्येक खेळाडूचे ध्येय संघासाठी भरीव योगदान देणे हेच असते. देशासाठी दीर्घकाळ खेळायला मिळणे, हा मी माझा सन्मान मानतो,” अशी भावना त्याने व्यक्त केली.

2023 विश्वचषक फायनलची सल कायम

2023 च्या वनडे विश्वचषक फायनलमधील पराभवाची सल आजही मनात असल्याचे विराटने सांगितले. “तो पराभव पचवणे खूप कठीण होते. अंतिम सामन्यात मी 54 धवांवर खेळत होतो आणि मोठ्या शतकासाठी सज्ज होतो. जर मी त्यावेळी 140-150 धावांची मोठी खेळी केली असती, तर आपण तो सामना नक्कीच जिंकला असता,” अशी खंत विराटने व्यक्त केली.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट