AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : आपला संबंध संपला..! विराट कोहली याने घेतला मोठा निर्णय

One8 Commune, Virat Kohli : वन8 कम्यून हे बंगळूरुस्थित प्रसिद्ध रेस्टॉरंट, बंद करण्यात आलं आहे. 2 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाने रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Virat Kohli : आपला संबंध संपला..! विराट कोहली याने घेतला मोठा निर्णय
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णयImage Credit source: PTI
| Updated on: Apr 22, 2026 | 1:01 PM
Share

Virat Kohli, One8 Commune : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीमुळे (Virat Kohli) चर्चेत असलेलं बंगळूरुमधील वन8 कम्युन आता बंद झालं आहे. कोर्टाच्या निर्णयावर आता या रेस्टॉरंटला टाळं ठोकण्यात आलं आहे. बंगळूरु दिवाणी न्यायालयाने ‘ वन8 कम्यून ‘ हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत, कारण त्याच्या मालकांवर 2 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. एवढंच नव्हे तर 2 कोटी रुपयांच्या बिलासह इतर थकीत देयकेही अजून पेडिंग आहेत, असी माहिती समोर आली आहे. ‘ट्रायो हिल्स हॉस्पिटॅलिटी’द्वारे हे रेस्टॉरंट चालवलं जात होतं, मात्र त्यांनी सुमारे 6 महिन्यांपासून भाडचं भरलं नव्हतं, असंही उघड झालंय.

विराटने तोडलं नातं

कोर्टाच्या या निर्णयानंतर आता विराट कोहलीने वन8 कम्यून रेस्टॉरंटशी आपले संबंध पूर्णपणे संपवले आहेत. एकेकाळी विराट हा या रेस्टॉरंटचा चेहरा होता. पण आता मात्र त्याने केवळ रेस्टॉरंटमधील आपला हिस्साच संपवलेला नाही, नाही, तर त्यासोबतच्या असलेलं ‘वन8’ हे आपलं ब्रँड नेम देखील काढून घेतलं आहे.

कर्ज न फेडल्याने लागलं कुलूप

असं म्हटलं जातयं की वन8 कम्युनचं केवळ मागील सहा महिन्यांचं भाडंच नव्हे, तर देखभाल शुल्क आणि महसुलातील वाटाही थकीत होतं. वारंवार नोटीस देऊनही काहीच परिणाम न झाल्याने, भाडं न भरल्याने, अखेर इमारतीच्या मालकाने न्यायालयात धाव घेतली. जिथे शेवटी न्यायालयाने रेस्टॉरंट बंद करण्याचा आदेश दिला.

आधीही वादात सापडलं होत वन8 कम्यून

विराट कोहलीच्या नावामुळे प्रसिद्ध असलेलं वन8 कम्यून रेस्टॉरंट हे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वही ते अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी होतं. बंगळूरू महानगरपालिकेने यापूर्वी अग्निसुरक्षा आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हॉटेलला नोटीस बजावली होती. असं म्हटलं जातंय की, वन8 कम्युनच्या समस्यांना कंटाळून विराट कोहलीने आता फारकत घेतली आहे.

कोर्टाच्या आदेशनांतर, आता कर्ज फेडले जाईपर्यंत वन8 कम्युन हे बंदच राहणार आहे. व्यवसायातील तोट्यामुळे ही कर्जाची समस्या निर्माण झाली असून, ग्राहकांची घटणारी संख्या आणि घसरत असलेले ब्रँड मूल्य हे देखील त्यामागचं प्रमुख कारणं असल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज माग
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!
उमेदवारी मागे घेताच ठाकरेंचा दणका; बाळ मानेंची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
भाजपवर हल्लाबोल अन्.... सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत खळबळ
Vidhan Parishad Election | भाजपवर हल्लाबोल अन् आता मंत्रीपदावर दावा; सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा खळबळ
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन्
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम
महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार....
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार... छत्र्या, रेनकोट काढून ठेवा; मान्सून अखेर केरळात