Asia Cup 2025 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी?; शुबमन गिलचं काय होणार ?
Asia Cup Squad : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा आता कधीही होऊ शकते. UAEमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे.

Asia Cup India Squad : पुढल्या महिन्यात म्हणजेच 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धा सुरू होत आहे, त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्च्य तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघ जाहीर होऊ शकतो. तसेच या स्पर्धेद्वारे शुभमन गिल टी-20 संघात परतू शकतो असे वृत्त आहे. गिल बऱ्याच काळापासून भारताच्या टी-20 संघाचा भाग नाहीये. त्याने त्याचा शेवटचा टी-20 सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. पण आता आशिया कपमधून त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते अशी खबर आहे. गिल व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांची नावेही शर्यतीत आहेत.
गिल, यशस्वी आणि साई , तिघेही रेसमध्ये – रिपोर्ट
यशस्वी जयस्वाल हा देखील एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमुळे टी-20 संघाबाहेर आहे. परंतु, आशिया कपमध्ये त्याच्या निवडीबद्दल देखील विचार केला जाऊ शकतो, असे वृत्त आहे. आशिया कप स्पर्धा ही 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला एकूण 6 सामने खेळावे लागतील. गिलप्रमाणेच, यशस्वी हाही गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या जर्सीमध्ये शेवटचा टी-20 सामना खेळताना दिसला होता.
शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त, साई सुदर्शनचीही आशिया कप संघात निवड होण्याबद्दल बातम्या येत आहेत. आयपीएलमध्ये शुबमन गिलसोबत खांद्याला खांदा लावून काम करून, गुजरात टायटन्सचा मजबूत पाया रचणाऱ्या सुदर्शनने गेल्या वर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आतापर्यंत फक्त एकच टी20 सामना खेळला आहे. मात्र, प्रश्न असा आहे की जर निवडकर्त्यांनी गिल आणि यशस्वीची निवड केली तर साई सुदर्शनची निवड का केली जाईल? कारण हे तिघेही खेळाडू टी20 मध्ये ओपनिंगला येतात.
अभिषेक शर्माला आपोनिंगला कोणाची साथ मिळणार ?
गिल, यशस्वी आणि साई सुदर्शन.. अभिषेक शर्मा आधीच टी20 संघात असल्याने या तिघांचीही निवड होणे कठीण वाटते. अभिषेक शर्मा सध्या टी20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे.
आशिया कप नंतर लगेच वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका
आशिया कपनंतर लगेचच, म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून, वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तर आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी आहे. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, भारतीय निवड समिती त्यानुसार निर्णय घेताना दिसेल.
